मुंबई
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलन केले. तर, त्यांना प्रत्युत्तर म्हणून लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागू देणार नाही म्हणून आंदोलन केले. मराठा-ओबीसी आरक्षणावरून (Maratha And OBC) सुरू असलेल्या आंदोलनामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र निर्माण झाले होते. आरक्षण बचाव यात्रा (Aarakshan Bachao Yatra) ही फक्त ओबीसींच्या बाबतीत होती, असा भ्रम राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचे नेते करत आहेत, असा दावा वंचितचे (Vanchit Bahujan Aghadi) महासचिव किसन चव्हाण (Kisan Chavan) यांनी केला.
मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष पेटलेला होता. हा संघर्ष राजकीय असू शकतो पण, तो सामाजिक होऊ नये म्हणून ॲड. प्रकाश आंबेडकरांनी ‘आरक्षण बचाव यात्रा’ काढून समाजात पेटलेला संघर्ष शांत केला आहे. असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांनी केला आहे.
मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष पेटलेला होता. हा संघर्ष राजकीय असू शकतो पण, तो सामाजिक होऊ नये म्हणून ॲड. प्रकाश आंबेडकरांनी ‘आरक्षण बचाव यात्रा’ काढून समाजात पेटलेला संघर्ष शांत केला आहे. आरक्षण बचाव यात्रा’ ही फक्त ओबीसींच्या बाबतीत होती, असा भ्रम राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस, शिवसेना उबाठाचे नेते करत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या मराठा समाजातील कार्यकर्ता, पदाधिकारी यांना कितीही डोळा मारायचा प्रयत्न यांनी केला, तरी मराठा समाजाचा पदाधिकारी, कार्यकर्ता यांच्या गळाला लागणार नाही. असे किसन चव्हाण यांनी सांगितले.