26.9 C
New York

UPSC : युपीएससी करणार उमेदवारांचं आधार व्हेरिफिकेशन

Published:

देशभरात माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण (Pooja Khedkar)गाजलं. बोगस कागदपत्रांची पूर्तता करून युपीएससी रँकची नोकरी मिळवली. पूजा खेडकरचे अनेक कारनामे या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर (UPSC) समोर आले. तिच्या नोकरीवर गदा आलीच शिवाय गुन्हाही दाखल झाला. या प्रकरणानंतर आता यूपीएससीने शहाणे होत कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने यूपीएससीला नोंदणी आणि भरती परीक्षेसाठी विविध टप्प्यात उमेदवारांची ओळख पटविण्यासाठी आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करण्यास परवानगी दिली आहे. परंतु हे ऐच्छिक स्वरुपात असणार आहे.

केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचनाही प्रसिद्ध केली आहे. यामध्ये म्हटले आहे की यूपीएससीला वन टाइम रजिस्ट्रेशन पोर्टल वर रजिस्ट्रेशन करतेवेळी आणि भरतीच्या विविध टप्प्यांत उमेदवारांची पडताळणी करण्यासाठी आधारकार्डद्वारे व्हेरिफिकेशन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आधार अधिनियम 2016 च्या सर्व तरतुदी त्या अंतर्गत तयार करण्यात आलेले नियम आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा द्वारे दिलेल्या निर्देशांचे पालन यूपीएसीला करावे लागेल अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांची ओळख पटवताना केंद्रीय लोकसेवा आयोगाला आधार संबंधित जे काही नियम आहेत त्या सर्वांचे पालन करावे लागणार आहे. पूजा खेडकर प्रकरणात ज्या पद्धतीने फसवणुकीचे प्रकार समोर आले होते त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सरपंचांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव होणार मंजूर; गिरीश महाजनांचा शब्द

UPSC निर्णय का घेण्यात आला

यूपीएससीने मागील महिन्यात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती. तसेच सिव्हिल सेवा परीक्षेत फसवणुकीचा प्रयत्न केला म्हणून त्यांना भविष्यात सर्व परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली. पूजा खेडकरवर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आणि ओबीसी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र बनवण्यासह अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img