3.8 C
New York

Amol Mitkari : आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; अमोल मिटकरींचा सरकारला घरचा आहेर

Published:

अकोला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj Statue Collapsed) यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. विरोधकांकडून सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तर, या घटनेवरुन महायुतीतही ठिणगी पडल्याची चर्चा आहे. या घटनेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी जनतेची जाहीर माफी मागितली होती. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP Protest) आज काळी पट्टी बांधून मुक आंदोलन करण्यात येत आहे. जयदीप आपटे (Jaydeep Apte) यांनी तयार केलेल्या पुतळ्यामध्ये विडंबन आहे. महाराजांच्या भुवयांच्या वर खोप दाखवल्या गेली आहे. ती खोप का दाखवली हे स्पष्ट झालं पाहिजे आणि आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी शिल्पकार जयदीप आवटेवर गंभीर आरोप केला आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याने जाणीपूर्वक महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या वर कपाळावर खोप जखमेची खूण ठेवून दिल्याचा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच, शिल्पकार जयदीप आपटेला पुतळा घडविण्याचे कंत्राट कुणी दिले याची चौकशी करण्याची मागणी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत अमोल मिटकरी यांनी केली.

राज्यात महाराजांचे अनेक पुतळे 50 वर्षांपासून दिमाखात उभे आहेत. शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राची अस्मिता नाही अख्या जगाची अस्मिता आहे. आणि अशाप्रकारे महाराजांचा पुतळा तीन महिन्यात घाईघाईत का उभारला, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केलाय. अजूनही तो आरोपी मोकाट आहे, असा आरोपही केलाय. आपटे यांनी तयार केलेल्या पुतळ्यामध्ये विडंबन आहे. महाराजांच्या भुवयांच्या वर खोप दाखवल्या गेली आहे. ती खोप का दाखवली हे स्पष्ट झालं पाहिजे आणि आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. यावेळी शाहीर अज्ञानदास यांच्या पोवाड्यातील प्रतापगडावरील किस्सा मिटकरी यांनी सांगितलाय. शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचा विडंबनाचा खुलासा झाला, पाहिजे अशी मागणी सुद्धा मिटकरी यांनी केली आहे.

मी स्पष्टपणे सांगितले की, आपटे नावाचा व्यक्ती त्याला साधा प्रपंच चालवायची अक्कल नाही. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचं कंत्राट कोणी आणि कसं दिलं हेच हास्यास्पद आहे. जयदीप आपटेने हे काम कसे केले? जयदीप आपटेला हे कंत्राट कसे मिळाले? कोणता मंत्री त्याला पाठीशी घालतोय?, याची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की, जयदीप आपटे हा जिथे कुठे दडून बसला असेल त्याला शोधून काढावे असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याला खोप ही जाणीवपूर्वक दाखवण्यात आल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला आहे. शिवाजी महाराजांचे जगभरात जितके पुतळे आहे कोणत्याही पुतळ्यात डाव्या भुवयाच्यावर खोप दाखवण्यात आलेली नाही. पण, हे जाणीवपूर्व चुकीचा इतिहास महाराष्ट्राच्या माथी मारला गेला. शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्यांवर खोप का दाखवली गेली? याचा खुलासा नौदल किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने करावा अशी मागणी सुद्धा अमोल मिटकरी यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img