26.6 C
New York

Rajkot Fort Rada : राजीनामा द्या, मालवण राड्यानंतर संजय राऊत संतापले

Published:

मुंबई

राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यावरून (Rajkot Fort Rada) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. शिवरायांचा पुतळा उभारणीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या (Shivaji Maharaj Statue) निर्मितीमध्ये हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय. तेच पैसे निवडणुकीत वापरलेले आहेत, असा आरोप देखील त्यांनी केलाय. राऊतांनी थेट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं नाव घेत सरकारवर घणाघात केलाय.

याप्रकरणी आंदोलनं करून काही होणार नाही, तर राजीनामे द्या. अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केलीय. काल झालेल्या राड्यावरून त्यांनी गृहखात्यावर खोचक टीका केलीय. मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर काल झालेला प्रकार महाराष्ट्राच्या गृह खात्यावर थुंकण्याचा प्रयत्न असल्याची टीका राऊतांनी केलीय. शिवाजी महाराजांच्या संदर्भात भाजपचं कृत्य नीच असल्याचं त्यांनी म्हटलंय. सरकारविरोधात महाविकास आघाडीचं जोडेमार आंदोलन १ तारखेपर्यंत सुरूच राहणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय.

संजय राऊत म्हणाले की, काल मालवणमध्ये झालेला प्रकार निर्लज्जपणाचा कळस आहे. पोलिसांना भररस्त्यात शिव्या घालता, कॉलर पकडता. हा काय प्रकार आहे. फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात ना? तुमच्या काळजाला धक्का बसला नाही का? माझ्या पोलिसांवर माझ्या पक्षाचे गुंड धक्काबुक्की करतायेत, शिव्या घालतायेत काय चाललंय या राज्यात? राष्ट्रपती कुठे आहेत? राष्ट्रपतींना पश्चिम बंगालमधील घटनांची काळजी वाटते. महाराष्ट्रात महाराजांचा पुतळा कोसळला तरी वेदना झाल्या नाहीत का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे. ते पोलिसांना सुरक्षा देऊ शकले नाहीत, सन्मान देऊ शकले नाहीत आणि त्यांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत. कालच्या राड्यावेळी भाजपाच्या गुंडांनी फक्त पोलिसांवर हल्ला करणे बाकी होते. खरं तर हा पोलीस दलावर थुंकण्याचा प्रकार आहे. असे असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी राजकोट किल्ल्यावरील नारायण राणे यांच्या कृतीचे समर्थन केले आहे. नारायण राणे हे आक्रमकच बोलतात, ही त्यांच्या बोलण्याची स्टाईल आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मग आम्हीही आक्रमक बोलल्यावर आमच्यावर गुन्हे दाखल का करता? असा प्रश्न संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

संजय राऊत म्हणाले की, नारायण राणे हे इतके नमकहरामी करतील असं वाटलं नव्हतं. कारण बाळासाहेब ठाकरे हे अख्ख्या महाराष्ट्राचे बाप आहेत. ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं, मंत्री केलं, पदं दिली, अन्नाला लावलं, प्रतिष्ठा दिली, महाराष्ट्राला अस्मिता दिली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ज्यांनी महाराष्ट्राला लढायला शिकवलं, त्यांच्याबद्दल ते प्रश्न विचारत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी जे जोडेमारो आंदोलन करणार आहे, ते योग्यच आहे, अशा शब्दात संजय राऊत नारायण राणेंबद्दल जास्त बोलणं टाळलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img