3.6 C
New York

Dress Code : कार्यालयात जीन्स पँट परिधान करून याल तर नो एन्ट्री

Published:

हरियाणा राज्यातून एक मोठी बातमी समोर (Haryana News) आली आहे. येथील हिसार महापालिकेने असा एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. खरं तर ड्रेसकोड बाबत हा निर्णय आहे. येथील आयुक्तांनी जीन्स आणि पायात चप्पल (Dress Code) परिधान केलेल्या लोकांना कार्यालयात बंदी घातली आहे. आयुक्तांचं हे अजब फर्मान अनेकांच्या पचनी पडलेलं नाही. आयुक्तांनी या संदर्भात एक आदेशच जारी केला आहे. जो कोणताही अधिकारी आणि कर्मचारी जीन्स परिधान करून कार्यालयात येतील त्यांना गेटवरूनच माघारी धाडण्यात येईल. उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील रहिवासी आणि हरियाणा कॅडरच्या आयएएस अधिकारी डॉ. वैशाली शर्मा या हिसार पालिकेत आयु्क्त म्हणून नुक्त्याच रुजू झाल्या आहेत.

डॉ. शर्मा कारभार हाती घेताच हा आदेश दिला आहे. या आदेशाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. कार्यालयात अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पायात चप्पल आणि जीन्स घातलेले पाहिले आहे. यामुळे चुकीचा मेसेज जातो. तसेच मलाही या गोष्टी पटत नाहीत असे शर्मा म्हणाल्या. शर्मा यांनी आदेशात स्पष्टपणे म्हटलं आहे की आजपासून महापालिकेच्या कार्यालयात ड्रेसकोडचे पालन करावेच लागेल. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पायात बूट, पँट आणि शर्ट परिधान करूनच कार्यालयात यावे.

गुजरातमध्ये पावसाचं थैमान!

जर कुणी या आदेशाचं उल्लंघन केलं तर त्याला कार्यालयाच्या गेट वरूनच माघारी पाठवण्यात येईल. या आदेशानंतर आणखीही एक आदेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये म्हटले आहे की सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळेत ऑफिसला यावे. तसेच पूर्वसूचना दिल्याशिवाय कुणालाही ऑफीस सोडता येणार नाही. या आदेशाचे पालन करणे आता अधिकारी कर्मचाऱ्यांना बंधनकारक राहणार आहे. नव्या आयुक्तांच्या आदेशाला आता अधिकारी आणि कर्मचारी कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणा आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img