26.6 C
New York

Farmers : भात खरेदी बोनस पासून शेतकरी वंचित

Published:

रमेश औताडे, मुंबई

शेतकरी वर्ग रब्बी व खरीप हंगामात आपल्या हक्काच्या भात पिकाचे पैसे मिळतील या आशेवर बसलेले असताना शेतकरी (Farmers) संघाचे अधिकारी भात खरेदी नोंदी योग्य प्रकारे करत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे भात खरेदी बोनस चे पैसे मिळाले नाहीत.

या अन्यायाविरोधात लोकमित्र रमेश हिंदुराव यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. आधारभूत किंमत धान खरेदी योजने अंतर्गत खरीप हंगाम २०२०-२१ मधील मुरबाड तालुक्यातील ५७८ शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये मिळणे बाकी आहे. ऑनलाईन कारभार म्हणजे आंधळ दळतंय अन् कुत्रे पीठ खातंय असा आहे. अधिकाऱ्यांनी खरीप हंगामात भात खरेदी केला व रब्बी हंगामाची नोंद केल्याने या शेतकऱ्यावर अन्यात झाला आहे. अशी माहिती यावेळी रमेश हिंदुराव यांनी दिली.

संगणक कारभार सुधारला तर वीज नसणे, वीज आली तर अधिकारी नसणे, अधिकारी असले की सरकारी पत्रव्यवहार अपुरा असणे, अनेक तांत्रिक त्रुटी व लाल फित कारभार यामुळे आम्ही शेतकरी आमच्याच हक्काच्या शेत मालाच्या पैशापासून वंचित आहोत. त्यामुळे सरकारने आमच्या मागण्या मान्य करून न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img