3.8 C
New York

Chitra Wagh : भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मराठी मालिकेत एन्ट्री ?

Published:

मराठीतील विविध वाहिन्यांच्या गर्दीत नवनवीन मालिकांची एन्ट्री होताना दिसतेय. नवा विषय आणि नव्या कथा हा आकर्षणाचा विषय ठरतय. यातच दुर्गा या नव्या मालिकेची सर्त्र चर्चा आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील या मालिकेच्या प्रोमोनेच प्रेक्षकांमध्ये उत्कंठा निर्माण केली आहे. ‘दुर्गा’ची शीर्षक भूमिका साकारणारी नायिका या मालिकेत पत्रकार दाखवण्यात आली आहे. आमदार दादासाहेब मोहित्यांमुळे तिच्या घराची वाताहत झालेली असते. दुर्गा देशमुख सूड घेण्यासाठी मोहितेंच्या घरात सून बनून येते, असे कथानक आहे. ‘कोकण वार्ता’ या न्यूज चॅनेलमध्ये काम करणारी पत्रकार दुर्गा, दादासाहेब मोहितेंच्या गुहागर याठिकाणी महाविद्यालयातील गैरप्रकारांसंदर्भात एक खास मुलाखत घेत असल्याचे मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये दाखवले आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये दिसते आहे की, दुर्गाने भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मुलाखत घेतली.

‘आमदार दादासाहेब मोहितेंच्या महाविद्यालयातील गैरप्रकारांवर, पत्रकार दुर्गाच्या बेधडक प्रश्नांना चित्रा वाघ यांनी दिलं रोखठोक उत्तर’, असे कॅप्शन देत वाघ यांच्या मुलाखतीचा प्रोमो कलर्स मराठी वाहिनीने शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दिसते आहे की, मोहितेंच्या महाविद्यालयातील कॉपी घोटाळाप्रकरणी दुर्गाने वाघ यांची मुलाखत घेतली. ‘कॉपी करावी मुलांना लागणं हे निंदनीय आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सोशल मीडियावर वाहिनीने शेअर केलेला व्हिडिओचांगलाच चर्चेत आला आहे.

आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; अमोल मिटकरींचा सरकारला घरचा आहेर

शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. दादासाहेब मोहिते स्वत: त्यांच्या कॉलेजमधील कॉपी प्रकारात लक्ष घालतील आणि पुन्हा अशाप्रकारची पुनरावृत्ती होणार नाही याचीदेखील काळजी घेतील याची मला खात्री आहे. दुर्गा तुझ्या लढ्यात मी तुझ्यासोबत आहे”.आपण अनेकदा राजकीय नेत्यांच्या मुलाखती पाहतो. पण मालिकेतच खऱ्या राजकीय नेत्याची मुलाखत पाहायला मिळतेय. हे वेगळेपण ही मालिका सुरुवातीपासूनच सिद्ध करतेय. शिवाय पत्रकाराच्या भूमिकेत दुर्गाला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पत्रकार म्हणून या भूमिकेत काय पैलू पाहायला मिळतील ? शिवाय या मालिकेचं कथानक पुढे काय वळण घेतय हे देखील या मालिकेत पुढे पाहायला मिळेलच.

Chitra Wagh चित्रा वाघ काय म्हणाल्या?

‘दुर्गा’च्या लढ्याला तिच्या संघर्षाला चित्रा वाघ या मालिकेत पाठिंबा देताना दिसल्या. शिक्षण घेणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आई-वडील खूप झटत असतात. अशाप्रकारे आई-वडीलांचे कष्ट आणि मुलांची मेहनत यामध्ये जर असे प्रकार होत असतील.. मुलांना कॉपी करावी लागत असेल तर हे अतिशय निंदनीय आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. दादासाहेब मोहिते स्वत: त्यांच्या कॉलेजमधील कॉपी प्रकारात लक्ष घालतील आणि पुन्हा अशाप्रकारची पुनरावृत्ती होणार नाही याचीदेखील काळजी घेतील याची मला खात्री आहे. दुर्गा तुझ्या लढ्यात मी तुझ्यासोबत आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img