4.1 C
New York

Eknath Shinde : नवा पुतळा उभारणीसाठी समिती नियुक्त; CM शिंदेंचा मोठा निर्णय

Published:

छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ (Chhatrapati Shivaji Maharaj) असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा कोसळला. या घटनेनंतर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारवर प्रचंड टीका केली आहे. यानंतर आता राज्य सरकारने वेगाने कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. पुतळा कोसळण्यामागे काय कारणे आहेत आणि या घटनेसंदर्भात कारणमीमांसा करण्यासाठी एक तांत्रिक समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे. अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांचा या समितीत स्थापत्य समावेश आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी काल रात्री महत्वाची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव आणि नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री नियुक्त केलेली समिती जबाबदारी निश्चित करणार आहे. जेजे स्कूल ऑफ आर्ट्स, आयआयटी, स्थापत्य अभियंते, राज्यातील नामांकित शिल्पकार आणि नौदलाचे अधिकारी यांची एक तांत्रिक समितीही स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या ध्वजाचा रंग गुलाबी? वसमतमध्ये झळकला गुलाबी घड्याळाचा ध्वज

Eknath Shinde नवा पुतळा उभारणार : CM शिंदे

या बैठकीत शिंदे म्हणाले जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलाने नौदल दिन साजरा करण्याच्या चांगल्या उद्देशाने पुतळा उभारला होता. आता भविष्यात पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. आता जो नवीन पुतळा उभारण्यात येईल तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img