8.3 C
New York

Shivaji Maharaj Statue : ‘एकदा नाही शंभरवेळा डोकं ठेवायला मी तयार’; शिंदेंनी मागितली माफी!

Published:

मुंबई

मालवण यथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेनंतर आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही फार दुर्देवी आणि मनाला मनाला दु:ख देणारी आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना आवाहन करत छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय राजकारणासाठी नसल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. मी त्याच्या चरणी 10 वेळा नाही तर 100 वेळा नतमस्तक होऊन माफी मागतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, त्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नौदलाचे अधिकारी होती. त्या बैठकीत दोन समित्या केल्या आहेत. एक समिती पुतळा दुर्घटना प्रकरणी चौकशी आणि कारवाई, तसंच दुसरी समिती ज्यामध्ये तज्ज्ञ असतील ज्यांना महाराजांचा पुतळा बनवण्याचा अनुभव आहे. याशिवाय शिल्पकार, इंजिनिअर, नेव्हीचे अधिकारी असतील”. तेथील वारे, पर्यावरण आणि एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन महाराजांचा नवा भक्कम पुतळा बसवला जाईल. विरोधकांनी याचे राजकारण करणे योग्य नाही. कारण मी महाराष्ट्राच्या आराध्य देव महाराजांच्या चरणी एकदा नाही तर 100 वेळा नतमस्तक होण्यास तयार आहे. अजित पवारांनीही माफी मागितली आहे. शिवाजी महाराज हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. विरोधकांनीही यावर राजकारण करू नये. नौदलाने अपघातस्थळाची पाहणी केली आहे.

काल रात्री महत्त्वाची बैठक झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या बैठकीत सिंधुदुर्गात घडलेल्या पुतळा दुर्घटनेबाबत चर्चा झाली. ही खरोखरच खूप वेदनादायी घटना आहे. काल झालेल्या बैठकीला सरकारी मंत्र्यांसह नौदल आणि पोलिस अधिकारीही उपस्थित होते. बैठकीनंतर एक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये नौदल अधिकारी, तज्ज्ञ वास्तुविशारद आणि इतर विषयांतील तज्ज्ञांचा समावेश आहे. ही समिती लवकरात लवकर कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img