26.6 C
New York

Haryana Election 2024 : भाजपला ‘ती’ जाहिरात नडली, निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Published:

लोकसभेनंतर हरियाणामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे (Haryana Election 2024) संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. यावेळी हरियाणामध्ये काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) मुख्य लढत पहिला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. यातच निवडणूक आयोगाने (Election Commission) भारतीय जनता पक्षावर मोठी कारवाई केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षांकडून उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उत्तर मागवण्यात आला असल्याची माहिती हरियाणाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने दिली आहे. हरियाणा भाजप अध्यक्षांना पाठवण्यात आलेल्या या नोटीसमध्ये म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने भाजपच्या जाहिरातीची दखल घेत हरियाणा भाजप अध्यक्षांना नोटीस पाठवली आहे. आणि त्यांना या प्रकरणात उत्तर देण्यासाठी 29 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेळ देण्यात आले आहे. सर्व 90 जागांसाठी 1 ऑक्टोबरला हरियाणामध्ये मतदान होणार आहे तर 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

नवा पुतळा उभारणीसाठी समिती नियुक्त; CM शिंदेंचा मोठा निर्णय

तर दुसरीकडे काँग्रेसने देखील एक मोठा निर्णय घेत हरियाणा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या एकाही खासदाराला तिकीट मिळणार नसल्याची माहिती काँग्रेसचे हरियाणा प्रभारी दीपक बाबरिया यांनी दिली. काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या सरचिटणीस आणि लोकसभा सदस्या कुमारी सेलजा यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र आता पक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही.तर हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी विधानसभा निवडणुकीसाठी खासदार चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांचा आझाद समाज पक्षाशी युती केली असल्याची माहिती दिली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img