12.1 C
New York

Ajit Pawar : रामदास कदम यांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं; राष्ट्रवादीच्या आंदोलनावर डागली तोफ

Published:

तुळजापूर

मालवमधील राजकोट राड्यावरून (Rajkot Fort Rada) संपू्र्ण राज्यात संतापाचे तीव्र पडसाद उमटत आहे. एकीकडे विरोधकांनी सरकारला घेरलंय तर दुसरीकडे महायुतीमध्येच (Mahayuti)जुंपल्याचं दिसतंय. शिवरायांचा पुतळा कोसळल्यावरून (Shivaji Maharaj Statue Collapsed) राजकारण करून कोणी पोळी भाजण्याचा (BJP) प्रयत्न करू नये, अशी टीका रामदास कदम यांनी केलीय. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (Ajit Pawar) निशाणा साधलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज पुण्यासह राज्यभरामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं राजकारण व्हायला नको, ही जाणूनबुजून झालेली घटना नाही. याची चौकशी होईल, जे दोषी असतील त्यांच्यावर नक्की कारवाई होईल असंही कदम यावेळी म्हणालेत. कदम यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रामदास कदम यांनी आज तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं, यावेळी ते बोलत होते.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती, तशी माझी देखील आहे. म्हणुन मी तुळजापूरची जागा ही शिवसेनेला घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी करणार आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलंय.

दरम्यान कदमांच्या या दाव्यामुळे महायुतीमध्ये वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे असुन विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील हे आमदार आहेत. आता ही जागा आता शिवसेना स्वत:कडे खेचून घेणार का? यासाठी काही हालचाली सुरू आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात आम्ही 100 जागा लढवू आणि किमान 85 ते 90 जागा जिंकून आणु, असा विश्वास देखील कदम यांनी व्यक्त केलाय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img