3.8 C
New York

Pravin Darekar : विरोधकांचे ‘जोडो मारो’ विकृत मानसिकतेतून; प्रविण दरेकर यांची टीका

Published:

मुंबई

एकीकडे भारत जोडोचे आंदोलन उभे करायचे आणि दुसऱ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेचा फायदा घेऊन विकृत मानसिकतेतून जोडो मारो आंदोलन करायचे. विरोधी पक्ष बिथरला आहे, अशी टीका भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे.

प्रविण दरेकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात झालेल्या घटनेचे समर्थन कुणी करणार नाही. त्याबाबत एफआयआर दाखल केला असून चौकशी सुरू आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिले आहे. घटनेला पाठीशी घालण्याचे कुणीच कामं करत नाही. परंतु विरोधी पक्ष या घटनेचे दुर्दैवी राजकारण करत आहे. बदलापूरला झालेली घटना अत्यंत निंदनीय होती. परंतु ज्या पद्धतीने त्या घटनेचा राजकीय वापर करत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फलक झळकावून सरकारची प्रतिमा मलीन करण्याचे कारस्थान काही शक्तींनी केले.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात महाराष्ट्रातून तिथे जाऊन या गोष्टीचे राजकारण करून शिवप्रेमी सरकारच्या विरोधात जावे अशी भुमिका विरोधक घेताना दिसताहेत. छत्रपतींच्या संदर्भात तुमच्या भावना काय होत्या, ४०-५० वर्ष सत्ता उपभोगून काय केलात ते महाराष्ट्राने पाहिले आहे. अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी छत्रपतींच्या गडकिल्ल्यासाठी, स्मारकासाठी काय केले हे पाहिले आहे. उलट देवेंद्र फडणवीसांच्या आणि या दोन वर्षाच्या शिंदेंच्या काळात गडकिल्ल्याची काळजी सरकार घेतेय. रायगड, प्रतापगडचे प्राधिकरण केले. आपले गडकिल्ले हेरिटेज व्हावे अशी सरकारने भुमिका घेतलीय. छत्रपतींचे विचार पुढे नेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही दरेकर म्हणाले.

प्रविण दरेकर म्हणाले की, टेंडरचा उद्धव ठाकरेंना नीट अभ्यास आहे. २५ वर्ष महापालिकेची सत्ता असल्यामुळे टेंडरचा विषय त्यांनी जवळून हाताळलेला आहे. तुमचे दुखणे टेंडरचे आहे की छत्रपतींच्या झालेल्या विषयासंदर्भात आहे हे एकदा स्पष्ट करा. मुंबई महापालिकेचा विकास गतीने होत असताना तुमचा जीव टेंडरमध्येच अडकलेला आहे. टेंडरवरच आपण जास्त बोलता. टेंडरवाले तुमच्याकडे येत नाहीत त्याची झळ तुमच्या मनात निश्चित असू शकते. छत्रपतींच्या बाबतीत टेंडर हा विषय असूच शकत नाही. जर टेंडर अयोग्य, चुकीच्या माणसाकडे असेल तर विरोधी पक्षाचीच काय आमचीही मागणी असेल संबंधित कोणीही असो त्यावर कारवाई झाली पाहिजे.

उद्धव ठाकरेंना अनुभवाच्या बाबतीत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांना मुख्यमंत्री पदाचा कोणता अनुभव होता. तरी मुख्यमंत्री पदावर बसले ना. अनुभव नसल्यावर कसे वाटोळे होते हे महाराष्ट्राने पाहिले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र अधोगतीकडे गेला. आदित्य ठाकरेंना प्रचंड अनुभव होता. २०-२५ वर्षाच्या टर्म मधील आमदार होते त्यांना मंत्री केले नाही. आपल्या लेकराला मंत्री केले. अनुभव नसताना मुलासाठी वाकलात. तुम्हाला किंवा मुलाला अनुभव नसताना महाराष्ट्राचे जसे वाटोळे झालेलं आहे. तसे अनुभवी माणसामुळे झाले असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल, सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, असेही दरेकर म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img