26.6 C
New York

Pooja Khedkar : पूजा खेडकरने UPSC चे सर्व आरोप फेटाळले

Published:

नवी दिल्ली

UPSC ला मला अपात्र ठरवण्याचा अधिकार नाही असे म्हणत माजी IAS अधिकारी पूजा खेडकरने (Pooja Khedkar) केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) लावलेले सर्व फसवणुकीचे आरोपांचे फोटाळून लावले आहेत. पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) दाखल केलेल्या रिजॅाईंडरमध्ये पूजा खेडकरने सर्व आरोप फेटाळूून लावले आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक करून IAS बनलेल्या पूजा खेडकरची उमेदवारी आयोगाकडून तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. पूजा खेडकरनं नाव बदलून फसवणूक केल्याचा आरोप युपीएससीनं केला होता. याला प्रत्युत्तर देताना आता पुजा खेडकरने युपीएससीच्या आरोपात तथ्य नसून UPSC ला मला अपात्र ठरवण्याचा अधिकार नसल्याचे पुजाने रिजॅाईंडरमध्ये म्हटले आहे. नाव बदलल्याची माहिती यापूर्वीच युपीएससीकडे दिली असल्याचं स्पष्टीकरणही पूजा खेडकरने दिले आहे. दरम्यान, या प्रकरणावर उद्या पुन्हा दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार असून, पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मिळणार की फेटाळला जाणार यावर काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नागरी सेवा परीक्षा-2022 या नुसार नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 31 जुलै रोजी UPSC ने पुजा खेडकरची तात्पुरती उमेदवारी रद्द केली एवढेच नव्हे तर, पूजा खेडकर यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीवरही बंदी घातली आहे. यूपीएससीने पूजा खेडकर यांच्या 2009 ते 2023 या काळातील सर्व रेकॉर्ड तपासल्यानंतर ही कारवाई केली आहे.पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचे उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने ही कारवाई केली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img