कोलकाता
कोलकाता प्रकरणात मोठी बातमी समोर आली (Kolkata Doctor Case) आहे. कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज (RG Kar Medical College) आणि हॉस्पिटलचे माजी प्रिन्सिपल संदीप घोष यांना (Sandip Ghosh) दणका बसला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) त्यांचे सदस्यत्वच निलंबित केले आहे. सीबीआयने महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात संदीप घोषची चौकशी केली होती. तसेच त्यांची लाय डिटेक्टर टेस्टही करण्यात आली आहे.
संदीप घोष यांच्यावर हत्या प्रकरणात कोणताच आरोप नाही. परंतु त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करावा लागत आहे. एका माजी कर्मचाऱ्याने डॉ. घोष यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मृतदेह आणि रुग्णालयात जमा होणाऱ्या बायोमेडिकल कचऱ्याची तस्करी त्यांच्याकडून केली जात होती असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याआधी सीबीआयने घोष यांच्या घरी छापा टाकला होता. येथे त्यांची तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली होती. येथून महत्वाचे पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. आतापर्यंत डॉ. घोष यांची 90 तास चौकशी झाली आहे.