एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, BCCI सचिव जय शाह (Jay Shah) यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) नवीन अध्यक्ष बनले आहे. जय शाह ग्रेग बार्कले (Greg Barclay) यांची जागा घेणार आहे. माहितीनुसार, जय शाह 1 डिसेंबर 2024 रोजी पदभार स्वीकारणार आहे. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे.BCCI सचिव जय शाह यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. जय शाह क्रिकेट इतिहासात ICC चे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहे. ICC चे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी तिसरी टर्म घेण्यास नकार दिल्याने या पदावर जय शाह यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जय शाह ICC चे अध्यक्ष बनणारे पाचवे भारतीय आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये मानाचे स्थान समजले जाणारे BCCI चे सचिव पद जय शाह यांच्याकडे होते. त्यांची बीसीसीआयच्या सचिवपदी निवड झाल्यानंतर त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल केले. आता जय शाह यांची ICC अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अनेक दिवसांपासून जय शाह यांचे नाव चर्चेत होते, त्यांना सर्वाधिक सदस्यांचा पाठिंबा असल्याचेदेखील बोलले जात होते आता या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाल्याचे पक्के झाले आहे.
पुन्हा एकदा X (Twitter) जागतिक आउटेजचा बळी
Jay Shah जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी निवड
भारतीय क्रिकेटमध्ये मानाचे स्थान समजले जाणारे BCCI चे सचिव पद जय शाह यांच्याकडे होते. त्यांची बीसीसीआयच्या सचिवपदी निवड झाल्यानंतर त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल केले. आता जय शाह यांची ICC अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
Jay Shah जय शाह यांच्या प्रगतीचा चढता आलेख
जय शाह यांच्या प्रगतीचा चढता आलेख राहिला आहे. जय शाह यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशनमधून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर जय शाह यांची 2019 साली पहिल्यांचा बीसीसीआयच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 2 वर्षांनी जय शाह यांना आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. त्यानंतर आता ते काही महिन्यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी सज्ज आहेत.