23.1 C
New York

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Published:

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (ladki bahin yojana) या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत. महिला व बाल सशक्तिकरणासाठी त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत राखीव 3 टक्के निधीपैकी 1 टक्का निधी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2024-25 आर्थिक वर्ष पुरताच हा निर्णय लागू असेल. राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत मिळून 3 हजार रुपये दिले आहेत. 31 ऑगस्टला अर्ज केलेल्या महिलांना पैसे दिले जाणार आहेत. त्याचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. लाडकी बहीण योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्धी, प्राप्त अर्जाची छाननी, तांत्रिक अडचणींचे निराकरण इत्यादींसाठी अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च होत आहे.

शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे फरार

तसेच इतर प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत महिला व बालविकास विभागास महिला व बाल सशक्तीकरण या योजनेसाठी राखीव असलेल्या 3 टक्के निधीपैकी एक टक्का निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

Ladki Bahin Yojana 31 ऑगस्टला मिळणार पैसे

महाराष्ट्रात जुलै महिन्यात अर्ज केलेल्या १.८ कोटी पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३ हजार रुपये देण्यात आले. ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या ४५ ते ५० लाख महिलांना ३१ ऑगस्टला ३ हजार रुपये दिले जाणार आहेत. हा राज्यस्तरीय कार्यक्रम नागपुरात होणार असल्याचे महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. कुटुंबातील महिला योजनेसाठी २.५ लाखांपेक्षा कमी उत्पनाच्या पात्र ठरणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img