10.6 C
New York

Ajit Pawar : अजित पवारांच्या सभेत जोरदार राडा; मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, पोलिसांचा सौम्य लाठीमार

Published:

हिंगोली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सध्या महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा काढली आहे. आज त्यांची यात्रा मराठवाड्यातील हिंगोली (Hingoli) येथे आली. यावेळी मराठा तरुणांनी अजित पवार यांच्यासमोरच एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. अजित पवार यांच्या हिंगोलीतील सभेत मराठा आंदोलकांनी (Maratha Andolan) जोरदार घोषणाबाजी केली. मराठा आंदोलक अधिक आक्रमक झाल्याने सभेत गोंधळ उडाला. यादरम्यान, पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हिंगोलीत सभा होती. सभेच्या ठिकाणी अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच, मराठा आंदोलक मोठ्या संख्येने तिथे पोहोचले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्हाला अजित पवार यांना निवेदन द्यायचे आहे, असे आंदोलकांकडून सांगण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली. एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा आंदोलकांकडून देण्यात आल्या. त्यामुळे सभेच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला होता.

त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका जाहीर करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबन प्रकरणी योग्य ती कारवाई करून महाराष्ट्राला साजेसा पुतळा तिथे उभा करावा, अशा इतर मागण्याही मराठा आंदोलकांनी केल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img