मालवण
मालवणमध्ये (Malvan) झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या (Shivaji Maharaj Statue Collapse) दुर्घटनेप्रकरणी विरोधांकांनी सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र डागले आहे, दरम्यान मालवणमधील भाषणातून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 महिन्यांपूर्वी मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. परंतू अवघ्या आठ महिन्यातचं हा पुतळा कोसल्याने, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सुरू झाले, राजकारणातून तीव्र प्रतिक्रया उमटल्या, दरम्यान महाविकास आघाडीकडून मालवणमध्ये आंदोलन करण्यात आले. मालवणमधील सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. ‘भाजपच्या कामाला गळती लागली आहे’ असं म्हणत आदित्य ठाकरेंनी अयोध्येच्या राममंदिराच्या बांधकावरून टीका केली आहे. देशातील कोणताही भाग भाजपने भ्रष्टाचार करण्यापासून सोडलेला नाही’ असं देखील ठाकरे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या डागडुजीसाठी जूनमध्ये पत्र गेलं होतं. अवघ्या सहा महिन्यात पुतळा निकृष्ट असल्याचं दिसलं. आपटे नावाचा मुलगा कुठे आहे. तो फरार कसा झाला. काल एक निर्लज्ज मंत्री आला आणि म्हणाला यातून चांगलं काही तरी घडेल. महाराष्ट्रात ज्या घटना घडत आहेत. पुण्यताील घटना असेल. बदलापूरमध्ये दहा दिवसानंतर एफआयआर घेतला. महाराजांचा पुतळा पडला. भ्रष्टाचारी सरकार आहे. महाराजांनाही हे सरकार सोडत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
पुतळ्यात भाजप चोरी करू शकतात हे अकलनाच्या पलिकडे आहे. हे व्हायला नको होतं. जगात अनेक पुतळे आहेत, जे समुद्र किनारी आहेत. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा १३८ वर्ष जुना पुतळा आहे. आपटे आहे कुठे, त्याला कुणी पळून जाला मदत केली. तो फरार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिथं शिवरायांचा हा पुतळा होता. त्या ठिकाणी जात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाहणी केली. जयंत पाटील, आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे इतर नेते यावेळी उपस्थित होते. त्याचवेळी नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे समर्थक राजकोट किल्ल्यावर पोहोचले. तिथे मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. राजकोट किल्ल्यावर जात असताना पोलिसांनी नारायण राणे यांना अडवलं. महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर असतानाच आपण जाऊ नये. थोड्या वेळात आपणास जायची परवानगी देतो, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. मात्र राणे समर्थकांनी यावेळी राडा केला.