-2.7 C
New York

Raj Thackeray : आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा? राज ठाकरेंचा संताप

Published:

Raj Thackeray : आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट किल्ल्यावर कोसळल्याने राज्यभरात संतापाच वातावरण आहे. पुतळा कोसळल्याने संपूर्ण शिवप्रेमी मधून संतापाची लाट उसळत आहे. या घटनेवरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील संतापले आहेत.

हा पुतळा केवळ अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याने महायुती सरकार वरती विरोधकांनीही हल्लाबोल केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील वर्षी या पुतळ्याचा अनावरण करण्यात आलं होतं. 35 फुटांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा हा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याने संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला.

या प्रकरणी राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करत सत्ताधाऱ्यांचे कान टोचले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार, काँग्रेस नेते अतुल लोंढेंचा गंभीर आरोप

काय आहे राज ठाकरे यांची पोस्ट?
अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असा कोसळतोच कसा? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचा अनावरण होणार आहे, तर त्याची तपासणी वगैरे केली होती का नव्हती? असा सवाल राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडियावरती ट्वीट उपस्थित केलाय.

राज ठाकरे असेही म्हणाले की, स्मारक उभारणं ही केवळ आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मागे पण त्यांनी असं म्हटलं होतं की, छत्रपती शिवाजी महाराजांचं खरंच स्मारक, हा कुठलातरी पुतळा नसून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड – किल्ले आहेत. पण आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागायची, राजकारण करायचं, स्मारकांची टेंडर काढायची, तुला काही मिळतंय का, हे पाहायच इतकच आपल्याकडे चालू आहे. ही अशी प्रतीकांच राजकारण करणारी व्यवस्था आता सर्वसामान्य माणसांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि जर तसं घडलं तर आपण खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं अभिमानाने म्हणू शकतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img