8.4 C
New York

Rain Update : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Published:

Rain Update : राज्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या घाटमात्यासह बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावलीय. मुसळधार पावसामुळे ओढ़े, नाले ओसंडून वाहत आहेत. तर आता भारतीय हवामान विभागाने मध्यप्रदेश गुजरात राजस्थान आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवस हा मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केलाय.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, आणि झारखंडमध्येही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर ३० ऑगस्टपर्यंत महाराष्ट्राच्या किनारी भागात समुद्राची स्थिती खडबडीत राहण्याची शक्यता आहे.

यंदाची आयडियल दहीहंडी ठरणार खास, दिव्यांगानाही मिळणार हंडी फोडण्याचा मान

शहरी भागांना देखील इशारा,
शहरातील काही भागात रस्ते बंद आणि पाणी साचण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. तर बागायती पिकांचे भूस्खलन होऊन नुकसान होण्याचा धोका देखील वर्तवण्यात आलाय. साठ किलोमीटर वेगाने वाऱ्याचा इशारा राजस्थानमध्ये देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img