21 C
New York

Kolkata Doctor Case : नवब्बा अभियान मार्चला हिंसक वळण;आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Published:

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर तरुणीवर (Kolkata Doctor Case) झालेला अत्याचार आणि हत्येच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज पश्चिम बंगालमध्ये कोलकाता आणि हावडामध्ये डॉक्टरांनी आंदोलन पुकारले असून नवब्बा अभियान मोर्चाचे (Nabanna March) आयोजन केले आहे. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

पश्चिम बंगालच्या आरजी का हॉस्पिटलच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी मंगळवारी कोलकाता आणि हावडा येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी नबान्ना अभियान पदयात्रा सुरू केली आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार केला असून त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या तसेच पाण्याचा माराही केला आहे.

मंगळवारी कोलकाता येथे नबान्ना अभियान निषेध मोर्चा गोंधळात पडला कारण निदर्शकांची पोलिसांशी झटापट झाली, ज्यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील कथित बलात्कार आणि खून प्रकरणाला प्रतिसाद म्हणून आयोजित केलेल्या या मोर्चामध्ये संतप्त सहभागींनी पोलिस बॅरिकेड्स तोडले आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दगडफेक केली.

कोलकाता येथील कॉलेज स्क्वेअर येथे सुरू झालेल्या या आंदोलनात सहभागी राज्य सचिवालय, नबान्ना यांच्याकडे जाताना दिसले, मोठ्या संख्येने हावडा येथील संत्रागाची परिसरात जमले होते. निदर्शक, ज्यांपैकी बरेच विद्यार्थी आणि सामान्य नागरिक होते, त्यांनी राष्ट्रीय तिरंगा हातात घेतला आणि त्यांच्या गंतव्यस्थानाकडे जाताना घोषणाबाजी केली.

या हत्या आणि अत्याचाराच्या घटनेविरोधात का विद्यार्थी संघटनेने हावडा स्थित सचिवालय नबन्ना येथे निषेध मोर्चा काढण्याची योजना आखली आहे. हावडा येथील संत्रागाछी येथे आंदोलक जमा होत आहेत. आंदोलकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत तीव्र निदर्शन केली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून शहरात 6,000 हून अधिक कोलकाता पोलिस तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक कोपऱ्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच आंदोलकांच्या पार्श्वभूमीवर कोलकाता पोलिसांनी हावडा ब्रीज पादचाऱ्यांसाठी बंद केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img