26.6 C
New York

Big Boss Marathi : अरबाजने फोडली भांडी, ‘बिग बॉस’च्या घरात मोठा राडा;

Published:

Big Boss Marathi : अरबाजने फोडली भांडी, ‘बिग बॉस’च्या घरात मोठा राडा;सध्या बिग बॉस मराठी च्या घरात पाचवा आठवडा सुरू झालाय. मात्र या घरामध्ये ‘ए’ टीम मध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र रितेश देशमुख ने रविवारी निक्कीला तिच्या विरोधात भाऊच्या धक्क्यावर काय काय बोललं जातं याच्या क्लिप्स दाखवल्या. आपल्या मागून आपलीच मंडळी गॉसिप करत असल्याचं यावेळेस निक्कीन पाहिलं. आणि ती भयंकर संतापली. आणि ‘ए’ ग्रुप मधून सर्वांसमोर तिने एक्झिट घेतल्याचे जाहीर केल.


त्यामुळे घरातील मैत्रीत फूट पडल्यान संपूर्ण समीकरण बदलून गेलेय. आणि अशा मध्येच या आठवड्यात बिग बॉस कडून जोड्यांचा टास्क देण्यात आलाय. घरातील प्रत्येक सदस्याला घरात मानकाप्याची दहशत असल्याने जोडीने फिरणं भाग आहे. मात्र ‘बिग बॉस’ कडून कोणता सदस्य एकटा फिरू शकत नाही असं जाहीर करण्यात आल. त्यामुळे आता एकूण सहा जोड्या घरात तयार करण्यात आल्यात. निकीच्या जोडीला अभिजीत असेल तर आर्या आणि अरबाज ची जोडी बिग बॉस ने बनवली आहे.

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

बिग बॉसच्या घरात अरबाज वेळ घातला मोठा राडा,

निक्की आणि अभिजीत ची मैत्री गेल्या अनेक दिवसांपासून अरबाजला खटकत होती. निक्की अभिजीत किचन मध्ये काम करत असताना तिकडे अरबाज येतो आणि त्यांच्यामध्ये काही शाब्दिक बाचाबाची होते. यानंतर चिडलेला अरबाज पुन्हा घरात जातो आणि भांडी फोडतो.
त्यामुळे भांडी फोडून शांत न बसता अरबाज बेडरूम मध्ये जाऊन सामानाची तोडफोड करू लागतो. आणि त्यावर “तू मला हर्ट करतेस”… असं निक्कीला अरबाज ओरडून सांगतो. बिग बॉसच्या घरात तोडफोड करणं नियमानुसार चुकीचं आहे. त्यामुळे आता यावर रितेश देशमुख काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img