9.5 C
New York

Rohit Sharma : यंदा आयपीएलमध्ये रोहित शर्मासाठी रेकॉर्डब्रेक बोली कोण लावणार ?

Published:

आयपीएलचं मेगा ऑक्शन आता जवळ आलं आहे. रोहित शर्माबद्दलच्या चर्चा मात्र त्यापूर्वीच वेगाने सुरू आहेत. त्याची डिमांड टी20 वर्ल्ड कपपासून तर खूपच वाढली आहे. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स टीमने त्याच्यासाठी 50-50 कोटी वाचवून ठेवल्याचा दावा नुकताच करण्यात आला होता. रोहित शर्मा कोलकाता नाईट रायडर्स टीममध्ये तर मागच्या सीझनमध्ये जाणार असल्याच्या अफवाही वेगाने पसरल्या होत्या. मात्र आता याच सर्व चर्चांदरम्यान प्रीति झिंटाच्या पंजाब टीमने रोहित शर्माला खरेदी करण्याची हिंट दिली आहे. पण त्यासाठी केवळ एकच अट आहे.

मात्र, पंजाब किंग्जचे क्रिकेट डेव्हलपमेंटचे प्रमुख संजय बांगर म्हटले की, रोहितला विकत घेणे हे आमच्या पर्सवर अवलंबून आहे. मेगा लिलाव झाल्यास, फ्रँचायझींना संपूर्ण संघ तयार करावा लागेल. संजय बांगर रोहित शर्माबाबत म्हणाले की, जर तो लिलावात दिसला तर त्याच्यासाठी मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. आम्ही त्याला विकत घेऊ की नाही हे आमच्याकडे किती पैसे आहेत यावर अवलंबून असेल. त्याला खरोखर विश्वास आहे की सर्व फ्रँचायझींची नजर रोहित शर्मावर असेल आणि त्याच्या नावावर मोठ्या बोली लागतील. आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवून सर्वांना आश्चर्यचकित केले.

Rohit Sharma रोहितच्या नेतृत्वात मुंबई संघ 5 वेळा ठरला विजयी

मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्मा कर्णधार असताना5 वेळा ट्रॉफी जिंकला आहे. मात्र त्यानंतरही फ्रँजायझीने गेल्या वर्षी त्याला कर्णधारपदावरून हटवलं होतं. हार्दिक पांड्याला त्याच्याऐवजी टीममध्ये घेऊन कर्णधार पद त्याच्याकडे सोपवण्यात आलं. मात्र त्यानंतर संघात बरीच फूट पडल्याची चर्चा होती. रोहित आणि हार्दिक पंड्या या दोघांमध्येही बेबनाव असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई संघ रोहितला रिटेन करणार नसून तो अन्य एखाद्या संघात सामील होऊ शकतो, असेही समोर आले आहे. रोहित शर्माचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो कोलकाता नाईट रायडर्समध्ये सहभागी होण्याबाबत बोलत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या दाव्याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img