बिग बॉस मराठी’चा नवा सीझन (Bigg Boss Marathi New Season) चांगलाच धुमाकूळ घालत आहे. (Bigg Boss Marathi) सर्वत्र या सीझनचीच चर्चा आहे. या आठवड्याचा ‘भाऊचा धक्का’ (Bhaucha Dhakka ) चांगलाच गाजला आहे. आता या आठवड्यात सदस्य का धमाका करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. कालच्या भाऊच्या धक्क्यानंतर निक्की (Nikki Tamboli) आता एकटी पडली आहे. त्यामुळे तिचा आता एकटीचा खेळ रंगणार आहे.
‘बिग बॉस मराठी’ च्या नव्या प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) आर्या अरबाजला म्हणत आहे, आता आपल्या सर्वांचा मेन दुष्मन एकच झालाय. त्यावर अरबाज निक्की असं उत्तर देतो. आर्या अरबाजला पुढे म्हणते,”विसरू नकोस”. अरबाज म्हणतो,”निक्कीला खूप त्रास द्यायचाय”. त्यावर आर्या म्हणते,”हो…पूर्णपणे”. अरबाज पुढे म्हणतो,”तू अभिजीतला इतका त्रास दे तिला काही नाही होणार”. यावर निक्की आणि आर्याला म्हणते,”किव येते मला त्या लोकांची. ‘बिग बॉस मराठी’चा आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. या आठवड्यात निक्कीचा चांगलाच बोलबाला आहे. काल इरिना बाहेर पडल्यानंतर आता या आठवड्यात कोणता सदस्य बाहेर पडणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
Bigg Boss Marathi ‘बिग बॉस मराठी’च्या घरावर आलंय मोठं संकट
‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो घाबरवणारा आहे. या नव्या प्रोमोमध्ये बिग बॉसने सांगितले आहे की, “सावधान… या घरावर आलंय एक मोठं संकट… तो आलाय.. मानकाप्या…”. या नव्या प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्यांची झोप उडालेली असून ते चांगलेच घाबरलेले असल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच घरात एका आरश्यावर लिहिलेलं आहे की, “एकटं फिरू नका…नाहीतर..मानकाप्या”. बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने जान्हवीला मोठी शिक्षा सुनावली आहे. आता आजपासून घरातील सर्वच सदस्य डेंजर झोनमध्ये असणार आहेत. आता यातून घरातील सदस्य आपला कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. आपल्या खेळीने इतरांना घाबरवणारे सदस्य आता स्वत:चं भित्रे झाल्याचे दिसत आहे.