केंद्र सरकारने कृषी संबंधित तीन विधेयक माघारी घेतले नसते तर, देशात आणखी काही भयंकर घटना घडल्या असत्या असे विधान कंगनाने केले होते. त्यावर राऊतांनी आम्ही कंगनाला गांभीर्यानेघेत नाही तुम्हीही घेऊ नका, असे म्हणत खासदार संजय राऊतांनी पंगा क्विन कंगना रणौतला डिवचले आहे. त्यामुळे येत्या काळात हे दोन्ही खासदार संसदेत आमने सामने येण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला. त्याठिकाणी बलात्कार झालेत, अनेकांच्या हत्यादेखील झाल्या आहेत असे विधान कंगनाने केले होते. त्यावर आता राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राऊतांनी अन्य मुद्द्यांवरून हल्लाबोल केला.
Sanjay Raut काय म्हणाले राऊत?
कंगनाच्या विधानावर बोलताना राऊत म्हणाले की, तिला तुम्ही फार मनावर घेऊ नका, आम्ही तिला फार गांभीर्याने घेत नाही. शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले हे जे वक्तव्य आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. पोलिसांनी कंगनाचे रितसर स्टेटमेंट घेतलं पाहिजे आणि मग पार्लमेंटमध्ये चर्चा करू असे राऊतांनी म्हटले आहे.
Sanjay Raut वसंत चव्हाण इतक्या लवकर जातील असे वाटले नाही
यावेळी राऊतांनी नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, नांदेडला लागलेल्या गद्दारीचा जो डाग होता तो धुवून काढण्यासाठी चव्हाण त्यांची प्रकृती बरी नसतानादेखील लोकसभेला उभे राहिले होते आणि नांदेडच्या जनतेने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. मात्र, ते आम्हाला इतक्या लवकर सोडून जातील असे वाटले नव्हते. सर्व शिवसेना परिवार त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, काँग्रेसचा एक सच्चा कार्यकर्ता हुकुमशाही विरुद्ध उभा राहिला आणि तो जिंकला पण दुर्दैवी आजाराने त्यांचे निधन झाले अशा शब्दांत राऊतांनी वसंत चव्हाणांना श्रद्धांजली वाहिली.
भाजपकडून जम्मू-काश्मीरसाठी 44 उमेदवारांची यादी जाहीर
Sanjay Raut ऑन आदित्य ठाकरे भाजप शिवसेना राडा
राऊतांनी छ. संभाजीनगर येथे आदित्य ठाकरे यांच्या हॉटेलबाहेर झालेल्या राड्यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, भाजपकडे सध्या काही काम नाही आहे, भाजप भ्रमिष्ट पक्ष आहे. त्यांचे सरकार आल्यापासून महिलांवरील, अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात वाढ झाली आहे. बदलापूरची घटना घडल्यावर महाराष्ट्रात 27 ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले, त्यांना याबाबत प्रश्न विचारला की, ते लोकं बनावट प्रकरण तयार करतात. आंदोलन करणारे भाजपचे कार्यकर्ते नाहीत तर पगारी वर्कर असल्याची टीकाही राऊतांनी केली. ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कुटुंब आहे, महाराष्ट्रातील लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे यातून तुमचेच मुखवटे गळून पडतील ठाकरे कुटुंबावर असे आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे.
पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर झालेला हल्ला हा पोलिसांवरचा नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा हल्ला असून, फडणवीसांनी राजीनामा द्यावा कराण त्यांचे पोलीसच सुरक्षित नाही आहेत. पुण्यात सर्वात जास्त अंमली पदार्थाचा व्यापार आणि व्यवहार होतो. ललित पाटील प्रकरणातील सूत्रधार कोण आहे हे आपण पाहिलेला आहे. पोलीस यंत्रणा कशी विकली गेली हे देवेंद्र फडणवीस यांना माहित नाही का ? असा प्रश्न उपस्थित करत राऊतांनी गुलाबी कपड्यात फिरणारे पुण्याचे पालकमंत्री नेमके काय करत आहेत असा सवाल राऊतांनी विचारला आहे.