-3.5 C
New York

Vaibhav Naik : शिवरायांचा पुतळा कोसळला; ठाकरेच्या शिलेदाराने PWD चे कार्यालय फोडले

Published:

मालवण

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले होते. मात्र अवघ्या आठ महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा पूर्णतः कोसळला आहे. या घटनेवरून कुडाळ-मालवण विधानसभा मतदार -संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मालवण येथील सार्वजनिक बांधकाम (PWD) विभागाच्या कार्यालयाची आमदार वैभव नाईक यांनी तोडफोड केली आहे. पुतळ्याची देखभाल व निगा राखण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. त्यामुळे या विभागाचे कार्यालय फोडण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भग्न पुतळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून शिवप्रेमींनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. तसेच वैभव नाईक यांनी देखील सरकारच्या निकृष्ठ दर्जाच्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज निकृष्ठ कामामुळे कोसळला. याबद्दल आम्हाला फार दुःख होत आहे. शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. गेल्या सहा महिन्यांपूर्वा कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला. त्यावेळी इथल्या स्थानिकांनी पुतळ्याच्या कामाविषयी तक्रारी केल्या होत्या. परंतु याकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं. मागील 400 वर्षपूर्वीच्या गड किल्ल्यांचे बांधकाम पाहिले असले तर एकही दगड किंवा चिरा ढासळली नाही. परंतु सहा महिन्यातच हा पुतळा कोसळला आहे. असे वैभव नाईक यावेळी म्हणाले

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img