3.8 C
New York

Uddhav Thackeray : ‘दादा’ म्हणत उद्धव ठाकरेंना ‘लाडक्या बहिणी’चे पत्र, राजकारणात खळबळ

Published:

मुंबई

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मानसशास्त्रज्ञ स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांनी त्यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. स्वप्ना पाटकर यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र (Letter) लिहून संजय राऊत यांच्यावर धमकी आणि छळ केल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणात पाटकर यांनी राऊत यांच्या विरोधात आयपीसी कलम 509, 506 आणि 504 अंतर्गत एफआयआर देखील दाखल केला होता.

स्वप्ना पाटकर मुंबईतील सांताक्रूझ भागात राहतात. मानसशास्त्रज्ञ आहे. त्या मुंबईत स्वतःचे क्लिनिक चालवतात. दरम्यान आता पुन्हा एकदा त्यांच्या पत्राने खळबळ उडाली आहे. स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. त्यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. स्वप्ना पाटकर यांच्या या पत्रामुळे राजकारणातील नैतिकता आणि नीतिमत्ता याबाबत नवीन चर्चा सुरू झाली आहे. महिला सुरक्षितता आणि त्यांच्या न्यायाचे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

स्वप्ना पाटकर यांचं पत्र

नमस्कार उद्धवदादा,

महिला सुरक्षितते बद्दल तुम्हाला बोलताना ऐकून खूप आनंद झाला. “नराधमांना तर शिक्षा झालीच पाहिजे, पण त्यांना पाठीशी घालणाऱ्यांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांवर दबाव आणला असेल, तर दबावाखाली आलेले पोलीस सुद्धा नराधमांएवढेच विकृत आहेत.” असे तुमचे ट्विट वाचून बरं वाटले.

मी 2016 ते 2021 तुम्हाला अनेक ईमेल लिहिले. सत्य परिस्थिती कळवली. संजय राऊत कसे माझा पाठलाग करत होते, मला धमकावत होते आणि त्यांच्या शिवाय इतर कोणा सोबत काम करू देणार नाही असं म्हणून घाबरवण्याचा प्रयत्न करत होते, हे मी फार स्पष्ट आपल्याला कळवले होते. माझावर हल्ले झाले, मला वेग वेगळ्या पोलीस स्टेशनला संबंध नसताना बोलावले जायचे, माझे काम बंद करण्यात आले, घरा बाहेर काढणार हा दबाव टाकला गेला. सगळे माहित असून तुम्ही काहीच मदत केली नाही. याचे मात्र मला वाईट वाटले.

माझा एक चित्रपट ” डॉक्टर रखमाबाई “रिलीज होऊ दिला नाही. माझे आणि अनेक कलाकारांचे प्रचंड नुकसान तुम्ही केले असे मला राऊत यांच्याकडून सांगण्यात आले. पण मला वाटत नाही तुम्ही असं कराल. त्यांनीच केले हे मला माहित आहे. फोन वर शिव्या गाळ, घर उध्वस्त केले, काम बंद करून जगण्याचे साधन संपवले. हे सगळे माहित असून देखील तुम्ही त्यांना पूर्ण शिवसेना हातात दिली. आणि त्यांनी माझी वाट लावली तशीच पक्षाची वाट लावली. असो. आता तुम्ही बहीणी साठी लढायला तयार आहात म्हणून विचारते. या बहिणीसाठी तुम्ही काय करणार ते महाराष्ट्राला नक्की सांगा. मी वाट पाहत आहे. तुमची लाडकी बहीण, स्वप्ना पाटकर.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img