18.9 C
New York

Sindhudurg : मालवणच्या राजकोट समुद्रकिनाऱ्यावरील  शिवरायांचा पुतळा कोसळला

Published:

मालवणमधील सिंधुदुर्ग (Sindhudurg) किल्ल्याच्या समोर राजकोट किनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज (सोमवार) दुपारी हा पुतळा कोसळला. शिवरायांचा पुतळा कोसळल्याने या पुतळ्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावरून शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. सुमारे ५ कोटी रुपये खर्च शिवपुतळा परिसर सुशोभीकरणासाठी करण्यात आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. नौदल दिननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023ला मालवणमध्ये येऊन या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. राजकोट किनाऱ्यावरील शिवपुतळा परिसर सुशोभीकरण व इतर कामांसाठी सरकारने ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. राज्य सरकार आणि नौदल विभागाने पुतळा उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतरच यांचे बांधकाम जलदगतीने पूर्ण केले होते.

‘दादा’ म्हणत उद्धव ठाकरेंना ‘लाडक्या बहिणी’चे पत्र, राजकारणात खळबळ

आमदार वैभव नाईक म्हणाले, शिवाची महाराजांचा पुतळ हा निकृष्ट कामामुळे कोसळल आहे. याबद्दल आम्हाला दु:ख होत असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो.सहा महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभरण्यात आला होता . ज्यावेळी काम सुरू होते त्यावेळी स्थानिक लोकांनी सुद्धा कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. पण त्यावेळी पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले. जे विरोध करत आहे करत आहेत ते आपल्या विरोधात आहे असा समज करुन घेतला. तसेच ही अत्यंत दुर्देवी घटना आहे, तिथले पालकमंत्री सर्व प्रकरणाची चौकशी करतील, पण त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे पुतळा लवकर उभा करणं हे आमचं पहिलं कर्तव्य असेल कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं होतं, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img