-4.5 C
New York

Shriyut Non Maharashtrian: श्रीयुत नॅान महाराष्ट्रीयन प्रेक्षकांच्या भेटीला, युवकांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर सिनेमातून भाष्य

Published:

Shriyut Non Maharashtrian: आपल्या देशात बेरोजगारी आणि विविध परीक्षांमध्ये होणार गैरप्रकार, पेपरफुटी प्रकरण सध्या खूप वाढत असलेल आपल्याला पाहायला मिळत आहे. हे सर्व देशातील ज्वलंत उदाहरण आहेत. त्यामुळे आपल्या देशात बेरोजगारी वाढत चालली आहे.अवघ्या काही जागांसाठी लाखो अर्ज भरले जातात. त्यामुळे अशा काही परीक्षामध्ये घोटाळे होतात, कधी पेपर फुटतो.त्यामुळे मेहनत करणाऱ्या युवकांच्या प्रवासामध्ये मोठे अडथळे निर्माण होतात. त्यातच मराठी माणूस व्यवसायात रिस्क घेऊन उद्योग करण्यापेक्षा नोकरीच्या शोधात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तसच नोकरी करण्यात तो जास्त समाधान मानतो.

अनेक बेरोजगार तरुण स्वतःचा छोटा – मोठा व्यवसाय करत नोकरी देखील करत असतात. याच संवेदनशील विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ हा चित्रपट यंदाच्या गणेशोत्सवात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. उत्तेजना स्टूडिओज प्रा. लि. निर्मित ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’(Shriyut Non Maharashtrian)या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडियावर प्रदर्शित झाला आहे. जनक सिंह आणि समीर रंधवे यामध्ये हे दोघे रंजक उद्योजक कॅफेच्या शाखा विस्तारण्यासाठी एका गुंतवणूकदाराच्या शोधात असल्याचे दिसते.

यामध्ये जनकच्या सभ्य व्यक्तिमत्वामध्ये आणखीन एक पैलू दडलेला आहे. तो ए. के. नावाच्या गुन्हेगाराच्या शोधात आहे. त्याला पकडण्यासाठी जनक कोणत्याही थरापर्यंत जाण्यासाठी तयार आहे. कोण आहे हा ए. के? जनक त्याला का शोधतोय ? तसेच त्यांचा काय संबंध आहे? हे सर्व जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

आम्ही कंगनाला…; शेतकरी मुद्द्यावरून संसदेत राऊत कंगना भिडणार

चित्रपटाचे दिग्दर्शक अजिंक्य उपासनी म्हणाले की,आपल्या मराठी माणसांना एका संवेदनशील मराठी चित्रपटाची गरज आहे.मराठी माणसे दिवाळी, ख्रिसमस या अशा सणांच्या दिवशी मराठी माणसे हिंदी चित्रपट बघतात. खास मराठी प्रेक्षकांसाठी गणेशोत्सवात संवेदनशील मराठी चित्रपट घेऊन येतं आहेत. आपल्या मराठी माणसांची टिपिकल प्रतिमा बदलणारा आणि मराठी युवकांना प्रेरणा देणार हा चित्रपट ठरेल अशी अपेक्षा आहे.

या’ दिवशी रिलीज होणार ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’

श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ या चित्रपटाची निर्मिती डॉ. पार्थसारथी आणि सौ. प्रेरणा उपासनी यांनी केली आहे. या मध्ये अभिनेता अथर्व देशपांडे, वैभव रंधवे, सायली वैद्य, संपदा गायकवाड, सर्वेश जोशी, गौरव उपासनी हे मुख्य भूमिकेत आहेत. अजिंक्य उपासनी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, छायांकन, संकलन, पटकथा अशी जबाबदारी घेतली आहे.

या चित्रपटाची कथा गौरव उपासनी यांची असून या चित्रपटाचे लेखन देखील त्यांनी केले आहे. तर सुमेध मिरजी यांनी या चित्रपटाचे संगीत व पार्श्वसंगीत यांनी दिले आहे. ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ हा चित्रपट ६ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.नोकर भरतीतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img