3 C
New York

Shivsena vs BJP : छ. संभाजीनगरमध्ये तुफान राडा, ठाकरे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी

Published:

छत्रपती संभाजीनगर

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान भाजपा आणि ठाकरे गटाचे (Shivsena vs BJP) कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. (BJP) यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. आदित्य ठाकरे थांबलेल्या रामा इंटरनॅशनल हॉटेलबाहेर हा सर्व प्रकार घडला. भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले.

परिस्थितीचं गांभीर्य बघता पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतल्याने अखेर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. याप्रकरणी आता पोलिसांनी दोन्ही पक्षातील काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. महत्त्वाचं म्हणजे घटनेची माहिती मिळतात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी पोहोचत भाजपा कार्यकर्त्यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी त्यांना थांबण्याची विनंती केली.

यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, पोलिसांनी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना वेळीच ताब्यात घेतल्याने तणाव शांत झाला. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला होता.

आदित्य ठाकरे हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये थांबले होते. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हॉटेलसमोर धडकले. त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करताच शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला. आमदार अंबादास दानवे भाजप पदाधिकाऱ्यांवर धावून गेले.

त्यामुळे क्षणार्धात दोन्ही गटात हाणामारी सुरु झाली. दोन्ही गटांमध्ये सुरु झालेला वाद सोडवताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली. सध्या पोलिसांनी भाजप आणि ठाकरे गटातील काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. सध्या परिसरात तणावपूर्व शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img