Pune Rain Update :गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. तसंच पावसाचा जोर देखील कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलाय. त्यामुळे हवामान विभागाने आज पुण्यात अतिवृष्टीचा इशारा दिलाय. त्यामुळे पुणेकरांची आता चिंता वाढली आहे.
खडकवासला धरणातून पावसाचा जोर वाढल्याने पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरु करण्यात आला आहे. 31 हजार क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग रविवारी रात्री उशिरा मुठा नदीपत्रात करण्यात आला.त्यामुळे शहरातील नदीकाठचा रास्ता जलमय झाला असून, वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आज देखील २६ ऑगस्ट रोजी पुण्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. पुन्हा पुर परिस्थिती पुण्यात निर्माण होऊ नये म्हणून, महापालिकेने आधीच सर्व तयारी केली आहे. शहरातील 41 बाधित ठिकाणांवर आपत्कालीन टीम तयार करण्यात आली आहे.
काँग्रेस विचाराचा निष्ठावान पाईक हरपला- नाना पटोले
आपत्कालीन परिस्थितीत पुणेकरांनो या नंबर वर संपर्क करा.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी 020-25501269, 020-25506800 हे दोन नंबर जारी करण्यात आलेत.41 बाधित भागात आरोग्य विभाग,घनकचरा विभाग,व्यवस्थापन विभाग अशा अनेक पथकांना महापालिकेकडून सज्ज राहण्याचं आवाहन करण्यात आलाय. पुण्यातील शिवणे पूल, पाटील इस्टेट झोपडपट्टी, पुलाची वाडी, ओंकारेश्वर मंदिर, भिडे पूल, शिवणे पूल,एकता नगर, भिडे पूल, या परिसरात यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्यात
कोल्हापूर आणि नाशिकात देखील पावसाचा जोर वाढला
पुण्याला आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर, घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांना अलर्ट राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलय. पुण्यासह नाशिकमध्ये देखील पावसाचा जोर वाढला आहे. गोदावरी नदीची पूरस्तिथी अद्यापही कायम आहे. 8 हजार 428 क्यूसेक वेगाने सध्या गोदावरी नदीत विसर्ग सुरू आहे.
पुणे नाशिक सोबत कोल्हापूरमध्ये देखील जोरदार पाऊस सुरु आहे. पंचगंगेचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर येण्यास सुरुवात झालीय. सध्या पंचगंगेची पाण्याची पातळी 26 फूट पाच इंचावर पोहचली आहे.तर जिल्ह्यातील एकूण २१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.