23.1 C
New York

Narendra Modi : पंतप्रधान मोदी लवकरच पाकिस्तान दौऱ्यावर? 

Published:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नुकताच युक्रेन दौरा केला. या दौऱ्याची चर्चा जगभरात झाली होती. पाकिस्तानचे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण मिळाले आहे. पाकिस्तानात ऑक्टोंबर महिन्यात होणाऱ्या शांघाय शिखर परिषदेसाठी (Shanghai Cooperation Organisation) पाकिस्तानने नरेंद्र मोदी यांना आमंत्रण पाठवले आहे. भारत पाकिस्तानमधील तणावाचं वातावरण जगजाहीर आहे. दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. तब्बल ८ वर्षांनंतर मोदींना पाकिस्तानकडून निमंत्रण मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. आता पाकिस्तानने मोदींना का बोलावलं आहे, मोदी पाकिस्तानला जाणार का? याकडे संपू्र्ण जगांचं लक्ष लागलेलं आहे.

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे यजमानपद सर्व सदस्य देशांकडे दिले जाते. यंदाची जबाबदारी पाकिस्तानवर आली आहे. इस्लामाबादमध्ये १५-१६ ऑक्टोबर रोजी SCO बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी पाकिस्तानचे वझीर-ए-आझम शाहबाज शरीफ यांनी भारताच्या पीएम मोदींना निमंत्रण दिले आहे. मात्र, पीएम नरेंद्र मोदी इस्लामाबादला जाण्याची शक्यता कमी आहे. विशेष म्हणजे, PM नरेंद्र मोदी नेहमीच विविध देशात आयोजित केलेल्या SCO बैठकीला उपस्थित राहतात, परंतु कझाकिस्तानमध्ये झालेल्या बैठकीला ते उपस्थित राहिलेले नव्हते. पंतप्रधानांच्या जागी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बैठकीला उपस्थिती लावली होती. त्यामुळे यंदाही पंतप्रधान मोदी पाकिस्तानात जाण्याची शक्यता कमी आहे.

Narendra Modi भारताकडून कोण जाणार? संपूर्ण देशाचं याकडे लक्ष

भारत आणि पाकिस्तानात बऱ्याच काळापासून तणावपूर्ण संबंध सुरू आहेत. तरीसुद्धा काही असेसुद्धा मुद्दे आहेत, जिथे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांनी एकत्र येऊन निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी हे २०२३ मध्ये भारतात झालेल्या एससीओच्या बैठकीत सहभागी झाले होते. दरम्यान, आता सीएचजी बैठकीला भारताच्या बाजूने कोण उपस्थित राहणार याबाबत सध्या कोणताही निर्णय झालेला नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img