18.3 C
New York

Vasantrao Chavan : नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन

Published:

नांदेडचे काँग्रेसचे खासदर वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. (Vasantrao Chavan) मध्यरात्री त्यांची तब्येत अचनाक बिघडली. त्यावेळी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर त्यांची आज 26 ऑगस्ट पहाटे 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वी वसंतराव चव्हाण यांची प्रकृती अचानक खालावली होती.

हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. श्वास घेण्यास वसंत चव्हाण यांना अडचण होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच, त्यांना लो बीपीचाही त्रास होत होता. मध्येच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना सुरुवातील नांदेड येथील रुग्णालयात त्यांना दाखल केलं. काही काळ तिथे उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं वसंच चव्हामांना हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. त्यानंतर वसंत चव्हाण यांना उपचारासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्सनं हैद्राबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आलं होतं.

Vasantrao Chavan वसंत चव्हाण यांची कारकीर्द

नांदेड जिल्ह्यात 2009 साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्यानं निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतराव चव्हाण हे ठरले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण-भास्करराव खतगावकर या नेत्यांशिवाय काँग्रेस जिंकू शकते, हे त्यांनी मोठ्या आश्वासकतेनं सिद्ध करत नांदेडमधील काँग्रेसचे वर्चस्व कायम राखलं. वसंत चव्हाण 1978 साली आपल्या नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेवरही काम केलं. 2002 साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते, पण नंतर लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली. तिथून पुढे तब्बल 16 वर्ष ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते.

Vasantrao Chavan घरातच राजकारणाचे बाळकडू

वसंतराव चव्हाण यांचा १५ ऑगस्ट १९५४ रोजी जन्म झाला होता. त्यांना राजकारणाचे बाळकडू त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण यांच्याकडून मिळाले होते.1987 साली ते नायगावचे सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग 24 वर्ष ते या पदावर होते. 1990 मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. 2002 मध्ये राष्ट्रवादी पक्षकडून पहिल्यांदा विधानसभेत पोहचले.2009 मध्ये अपक्ष आणि 2014 मध्ये काँग्रेस कडून त्यांनी नायगाव विधानसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसला मरगळ आली होती. त्या काळात त्यांनी संघर्षांची बाजू घेतली. काँग्रेसकडून त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img