-4.5 C
New York

GSB Ganpati : मुंबईतला सर्वात श्रीमंत गणपती, GSB सेवा मंडळाने काढला 400 कोटींचा विमा

Published:

GSB Ganpati:गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलाय. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. मुंबईच्या अनेक गणेशोत्सव मंडळांमध्ये मानाच्या गणपतींचे आगमन देखील झाले. जीएसबी सेवा मंडाळाच्या गणपतीची मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळख आहे.जीएसबीच्या गणपतीची नेहमीच सर्वत्र चर्चा असते. तसेच ह्या मंडळाचा गणपती बाप्पा हा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो.या बाप्पाची सर्व आभूषण देखील सोन्या – चांदीची असतात. तसेच या गणेशोत्सव मंडळाने आता पर्यंतचा सर्वात महागडा विमा या वर्षी काढला आहे. ४००.५९ कोटी रुपये अशी या विम्याची किंमत आहे.

जीएसबी सेवा मंडळातर्फे दरवर्षी हा गणेशोत्सव थाटामाटात साजरी केला जातो. तसेच जीएसबीचा राजा मुंबईतील लोकप्रिय गणपतींपैकी एक आहे. मुंबईतल्या किंग सर्कल येथे हे गणेशोत्सव मंडळ आहे. तसच या मंडळाचा बाप्पा पाच दिवसांचा असतो. या गणेशोत्सव मंडळाने यावर्षी मोठा विक्रम केलाय. या गणेशोत्सव मंडळाने ४०० कोटी रुपयांचा विक्रमी विमा काढला आहे. या विम्यामध्ये स्वयंसेवक, स्वयंपाकी, सेवा कर्मचारी, पार्किंग आणि सुरक्षा कर्मचारी, स्टॉल कामगार,गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक यांचा समावेश असणार आहे.

शाळेतील 15 दिवसांचे CCTV फुटेज गायब, दीपक केसरकरांची धक्कादायक माहिती

जीएसबी मंडळ यावर्षी ७० वा गणेशोत्सव साजरा करत आहे. तसेच या व्यतिरिक्त इतर विविध पॉलिसिंच्या आधारे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांव्यतिरिक्त हे मंडळ नैसर्गिक आपत्तीं, नैसर्गिक आपत्तीं यांच्या विरुद्ध विमा पॉलिसी देखील खरेदी करते. तब्बल ५ दिवसांच्या उत्सवासाठी या गणेशोत्सव मंडळाने ४००.५९ कोटींचा विमान काढला आहे. ७ ते ११ सप्टेंबर या कालावधीत गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक मोठी गर्दी करतात.

२०२३ मध्ये या गणपती मंडळाने ३६०.४० कोटी रुपयांचा विमा देखील काढला होता. दिवसाला २० हजाराहून जास्त भाविक या बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. पाच दिवस चालणाऱ्या या गणपती उत्सवात १ लाखाहुन अधिक भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img