-1.3 C
New York

Krishna Janmashtmi : जन्माष्टमीला द्वापर युग! जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त

Published:

Krishna Janmashtmi : जन्माष्टमीला द्वापर युग! जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्तबालकृष्ण जन्माष्टमीला यंदा श्रावण सोमवार आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. तुम्ही जर जन्माष्टमीच व्रत केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.असे मानले जाते.२६ ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरी केला जातो. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते. श्रावण अष्टमीला रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.मात्र यंदाची जन्माष्टमी थोडी खास आहे कारण, या जन्माष्टमीला द्वापर योग आलाय. यादिवशी जयंती योग, रोहिणी नक्षत्रासोबत, चंद्र वृषभ राशीत आणि सूर्य सिंह राशीत असल्याने गजकेसरी योगही जुळून आला आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमी तिथी?
रविवार 25 ऑगस्ट 2024 ला मध्यरात्री 3.39 वाजेपासून सोमवारी 26 ऑगस्ट 2024 मध्यरात्री 2.19 वाजेपर्यंत अष्टमी तिथी असणार आहे. तिथीनुसार 26 ऑगस्ट 2024 कृष्ण जन्माष्टमी आपल्याला साजरी करता येणार आहे. तर २७ ऑगस्ट रोजी दहीहंडी असणार आहे.

शिवरायांचा पुतळा कोसळला; ठाकरे गटाच्या शिलेदारकडून PWD चे कार्यालय फोडले

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेची विधी
कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री स्नान केल्यावर अंगावरती स्वच्छ कपडे परिधान करा. तसच अंघोळ केल्यावरती श्रीकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा चौरंगावर किंवा पाटावर मांडावी. नंतर त्यावर गंगाजल किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा. त्यांनतर मूर्तीला पंचामृत अथवा दुधाने स्नान घालावे. त्यांनतर चंदनाचा टीळा मूर्तीला किंवा प्रतिमेला लावावा. बाळगोपाळाचा साज- शृंगार करावा. मूर्तीसमोर तुपाचा अथवा तेलाचा दिवा लावावा. त्यावर फुलांच्या माळा अर्पण कराव्यात. नंतर धूप, अगरबत्ती लावावी. नंतर बालगोपाळाची आरती करावी. व त्यांनतर मनोभावे आरती करून साखर, मिठाई किंवा फळाचा नैवेद्य दाखवा.

कृष्ण जन्माष्टमीचे उपाय

बाल गोपाळाचा जन्म झाल्यावर जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता त्याला कुंकूमिश्रित दुधाचा अभिषेक करावा.
असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येईल.

    ताज्या बातम्या

    spot_img

    राजकीय

    spot_img