1.1 C
New York

Krushna Janmashtami : कृष्ण जन्माष्टमी 2024: इतिहास महत्त्व आणि याबद्दल बरच काही….

Published:

Krushna Janmashtami : हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी कृष्ण जन्माष्टमी हा एक सण आहे. या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. याला कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात. या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी भक्तजन उपवास करतात आणि जन्माष्टमीनिमित्त विधीही करतात. तर दुसऱ्याच दिवशी दहीहंडी साजरी केली जाते.

कृष्ण जन्माष्टमी आपण का साजरी करतो?
हिंदूंच्या पौराणिक कथेनुसार, श्रीकृष्ण भगवान विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. म्हणून हा उत्सव “कृष्ण जन्माष्टमी” म्हणून ओळखला जातो. भगवान कृष्णाची त्यांच्या बाल स्वरूपात पूजा करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. भगवान श्रीकृष्ण यांना बाल गोपाळ किंवा लड्डू गोपाळ असेही म्हटले जाते.

भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेमध्ये माता देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी झाला होता. जेव्हा (कंस) पृथ्वीवर राज्य करत होता आणि मानवतेचा नाश करण्याचा धोका होता, मात्र भगवान श्रीकृष्णाने कंस राक्षसाचा पराभव केला.श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लोक आपली घरे आणि मंदिरे दिव्यांनी सजवतात. परमेश्वराला प्रार्थना करतात, प्रभू श्रीकृष्णाच्या जन्मानंतर मध्यरात्री त्यांचा उपवास संपवतात. तसंच उत्सवाच्या पहिल्या दिवशी भजन, किर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच आयोजन देखील केले जाते. दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी विविध भागांत मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी केली जाते. हा सण प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्रात साजरा केला जातो पण आता हळूहळू हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो.

राज्यातील शेतकऱ्यांनासाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय


“ढाकुमाकुम् ढाकुमाकुम्” च्या तालावरती गोविंदा पथक आपले थर रचत असतात. केवळ एक दिवसासाठी जरी या सणाच वैशिष्ट्य असलं तरी, दहीहंडी फोडणारे बाळकृष्ण व गोविंदा पथक या सर्वांची खूप आतुरतेने आधीपासून वाट पाहत सराव करत असतात. ही दहीहंडीची प्रक्रिया अतिशय मजेशीर असते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी मिठाई फळे इत्यादी भरून एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. आणि या मडक्याला फोडण्यासाठी विविध गोविंद पथक प्रयत्न करत असतात. मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो तो म्हणजे गोविंदा. हा गोविंदा आपला तोल सांभाळत हंडी फोडतो. तसेच या हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांना विविध भेटवस्तू देऊन त्यांना गौरवण्यात येते. तसंच आता या गोविंदा सह गोपीकाही उत्सवात हजेरी लावतात. या गोपिका ही धाडस दाखवत थरांवर थर असून हंडी फोडतात. तसंच गोविंद पथकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून, विविध सेलिब्रेटी देखील या उत्सवाला हजेरी लावतात आणि त्यांना प्रोत्साहीत करत त्यांचा उत्साह वाढवतात.अशाप्रकारे गोकुळाष्टमी व दहीकाला उत्सव साजरा केला जातो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img