शंकर जाधव, डोंबिवली
सेव पेंढरकर मोहिमे अंतर्गत यावर्षी ‘एक हंडी शिक्षणाची’ या उपक्रमांतर्गत अभिनव पद्धतीने दहीहंडी (Dahi Handi) साजरी होणार आहे. माजी विद्यार्थी सोनू सरवसे यांच्या संकल्पनेतून ही हंडी हंडी उभारली जाणार असून हंडी फोडण्याचा मान शिक्षकांना असणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना माजी विद्यार्थी सोनू सरवसे म्हणाले, गरीब जनतेला मिळणारे सार्वत्रिक शिक्षण वाचवण्यासाठी व संस्थाचालकांची मुजोरी थांबवण्यासाठी ‘एक हंडी शिक्षणाची’ लावली जाणार आहे. तसेच मुलांमध्ये पुस्तकांच्या वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी व मराठी भाषेची अस्मिता जोपासण्यासाठी दहीहंडीला सलामी देणाऱ्या मंडळास पुस्तक दिले जाणार आहे. ही हंडी पेंढारकर महाविद्याला समोर सकाळी सकाळी 10 ते रात्री 10 वेळेत असेल.