21 C
New York

Mumbai Local : एक्सप्रेसमधील तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत

Published:

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची (Mumbai Local) सेवा विस्कळीत झाली आहे. कळवा रेल्वे स्थानकात एका एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. 20 ते 25 मिनिटे उशिराने सध्या मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल धावत आहेत. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक मिळालेल्या माहितीनुसार, विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवरील सर्व लोकल या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. लातूर एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे लातूर एक्सप्रेस ही कळवा स्थानकात थांबवण्यात आली आहे. वाहतुकीचा मोठा खोळंबा या एक्सप्रेसमुळे झाला आहे.

Mumbai Local लातूर एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुकीचा खोळंबा

लातूर एक्सप्रेसमध्ये झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर ती एक्सप्रेस रवाना होणार आहे. सध्या तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे या एक्सप्रेसमधील काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे कल्याण, कर्जत या ठिकाणावरुन सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याचे पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अनेक कर्मचाऱ्यांचा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने लेटमार्क लागणार आहे. या गोंधळामुळे ऐन कामाच्या वेळी झालेल्या प्रवाशी संतप्त झाले आहेत. मध्य रेल्वे उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहेत.

Mumbai Local प्रवाशांचा मोठा खोळंबा

मुंबईतील लाखो नागरिक हे सकाळी मुंबई लोकलने प्रवास करत असतात. मुंबई लोकलने प्रवास करत सकाळी लाखो चाकरमानी हे ऑफिस गाठतात. तर काही विद्यार्थी आपपल्या शाळा-कॉलेजला जाण्यासाठी लोकलने प्रवास करतात. हा बिघाड मात्र अचानक झाल्याने या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. अनेक प्रवाशांना त्यामुळे ऑफिसला पोहोचायला, तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर होणार असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत. तसेच रेल्वे उशिराने धावत असल्याने स्टेशनवरही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img