आगामी काळात जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir Election) होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून आज (दि.26) 44 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र, यादी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासातचं भाजपवर ही यादी स्थगित करण्याची वेळ आली. त्यानंतर आता पुन्हा 15 उमेदवारांची नवी यादी पक्षाकडून जारी करण्यात आली आहे.
Jammu Kashmir Electionतीन टप्प्यात निवडणूक
जम्मू- काश्मीरमध्ये पाच वर्षानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमिवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत पहिल्या टप्प्यासाठी १५, दुसऱ्या टप्प्यासाठी १० आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी १९ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली होती.
काँग्रेस विचाराचा निष्ठावान पाईक हरपला- नाना पटोले
Jammu Kashmir Election नवी यादी जाहीर
सकाळी 10 वाजता भाजपची यादी जाहीर झाली, त्यानंतर दुपारी 12 वाजता ती मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ही यादी रद्द झाल्यानंतर लवकरच नवी यादी जाहीर केली जाईल असे पक्षाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आता भाजपकडून जम्मू-काश्मीरसाठी नव्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Jammu Kashmir Election 8 मुस्लिम उमेदवारांना तिकीट
भाजपच्या 15 उमेदवारांच्या नव्या यादीत 8 मुस्लिम उमेदवारांनाही तिकीट देण्यात आले आहे. ज्या जागांवर हे मुस्लिम उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्या बहुतांश काश्मीर खोऱ्यातील आहेत. अभियंता सय्यद शौकत मयूर अंद्राबी, अर्शीद भट्ट, जावेद अहमद कादरी, मोहम्मद रफिक वाणी, अधिवक्ता सय्यद वजाहत, सोफी युसूफ, तारिक कीन आणि सलीम भट्ट यांना वेगवेगळ्या जागांवर तिकीट देण्यात आले आहे.