28.9 C
New York

Badlapur Case : शाळेतील 15 दिवसांचे CCTV फुटेज गायब, दीपक केसरकरांची धक्कादायक माहिती

Published:

मुंबई

बदलापूर प्रकरणाची चौकशी (Badlapur Case) करण्यासाठी शिक्षण विभागाने एक समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल आला आहे. याबाबतची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर (Deeepak Kesarkar) यांनी दिली आहे. बदलापूरच्या त्या शाळेमध्ये 15 दिवसाचं सीसीटिव्ही (CCTV Footage) रेकॉर्डिंग का गायब आहे? याची चौकशी पोलिसांनी करावी असे केसरकरांनी सांगितले. तसंच, शाळेच्या मॅनेजमेंटला जर सर्व माहिती असेल आणि त्यांचा या प्रकरणात सहभाग असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

दिपक केसरकर म्हणाले की, शाळेत जो प्रकार घडला त्यासंदर्भात चौकशी करण्यात आली. यावेळी सर्व अधिकारी उपस्थित होते. आम्ही अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला. घटना घडलेल्या शाळेमध्ये दोन सेविका होत्या. कामिनी वायकर, निर्मला भुरे या सेविका ज्या लहान मुलांना वॉशरुमला जायचे असल्यास त्यांना घेऊन जायच्या. या दोन्ही महिला चौकशीवेळी अनुपस्थित होत्या. त्यांची चौकशी ही गृहखात्याकडून होईल. सगळ्या मोठी चूक या दोन महिलांची आहे. त्या जर तिकडे असत्या तर हे प्रकरण घडलं नसतं. हे सगळ पाहता त्यांना सहआरोपी करावं.

दिपक केसरकर म्हणाले की, क्लास टीचर यांनी पोलिसांना सांगितले नाही. तसेच प्रिन्सिपल यांनी ही सांगितले नाही. त्यामुळे दोघांवर पोक्सोअंतर्गत कारवाई करावी ही शिफारस आम्ही गृहखात्याला करत आहोत. 16 तारखेला प्राईव्हेट हॉस्पिटलमध्ये मुलीला घेऊन गेल्यानंतर हे प्रकरण समजले. पण रात्री गुन्हा दाखल झाला. पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. मॅनेजमेंटला माहीत होतं आणि त्यांचा जर यात काही सहभाग असेल तर त्यांच्यावर पण कारवाई होईल. 15 दिवसाचं सीसीटिव्ही रेकॉर्डिंग का गायब आहे? याची चौकशी पोलिसांनी करावी. याप्रकरणाचा पुढील सर्व तपास गृहखाते करेल.

दिपक केसरकर म्हणाले की, तसंच मुलीच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी मी घेतली आहे. आम्ही फक्त काही मुद्दे समोर आणतोय. आम्ही यात चौकशी करु शकत नाही. पोलिस चौकशी करणार आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमली आहे. 15 दिवसाचं सीसीटिव्ही फुटेज गायब आहे. वॉशरुमजवळचं सीसीटिव्ही गायब आहे. शाळेच्या मॅनेजमेंटला सगळं माहिती असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. असे देखील केसरकर यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img