21 C
New York

AAP Candidate List : जम्मू काश्मीर विधानसभासाठी ‘आप’ने 7 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Published:

नवी दिल्ली

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी (Jammu Kashmir Election) आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. सात जागांसाठी उमेदवार जाहीर (AAP Candidate List) करण्यात आले आहेत. पुलवामामधून फयाज अहमद सोफी आणि राजपुरातून मुद्दसिर हसन या उमेदवारांचा पहिल्या यादीमध्ये समावेश आहे.

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यातील निवडणूक 18 सप्टेंबरला होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक 25 सप्टेंबरला होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होणार आहे. यासोबतच 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. आम आदमी पार्टीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यांनी सात जागांसाठी उमेदवार जाहीर केले.

पुलवामा विधानसभा मतदारसंघातून फयाज अहमद सोफी, राजपुरातून मुद्दसिर हसन, देवसर शेख फिदा हुसेन, दोरूमधून मोहसीन शफकत मीर, दोडामधून मेहराज दिन मलिक, दोडा पश्चिममधून यासिर शफी मट्टो आणि बनिहालमधून मुद्दसिर अजमत मीर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img