23.1 C
New York

Narendra Modi : लखपती दीदी मेळाव्यात पंतप्रधान मोदी ‘बदलापूर’चा उल्लेख करतील का?

Published:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज महाराष्ट्राच्या विविध दौऱ्यावरती आहेत. आज त्यांच्या उपस्थितीमध्ये जळगाव येथे महिला मेळावा पार पडत आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यामध्ये कोणती नवी घोषणा करणार,याची सर्वांनाच उत्सुकता आहे.राज्य शासनाने लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेचा प्रसार देखील जोरदार सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने लाडकी बहीण योजना ही सरकारला तारणार असा विश्वास सरकारला वाटत आहे.

त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव येथील जवळपास दीड लाख महिलांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय संदेश देणार? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. नरेंद्र मोदी जळगाव येथे येणार म्हणून केळी उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांच्याकडून अपेक्षा आहेत.
नुकत्याच बदलापूर मध्ये घडलेल्या दोन शालेय विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणावरून राजकारण सध्या तापलेला आहे. विशेषत: विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडी कडून भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करण्यात आले.

मोदींच्या दौऱ्यावर खडसेंचा बहिष्कार?

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण हेदेखील उपस्थित असतील. लाडकी बहीण योजना तसेच विविध विषयांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा आहे. त्यामुळे लखपती दीदी या कार्यक्रमात लाडक्या बहीण योजने व्यतिरिक्त काही महत्त्वपूर्ण योजना राज्य सरकारकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं आश्वासन दिलय. या प्रकल्पाला जवळपास दहा हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. म्हणून जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्र्यांनी यात लक्ष घातले तरच हा प्रकल्प पुढे जाऊ शकतो. बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात विरोधकांनी रान उठवले आहे. म्हणून महिला सुरक्षा यांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी काही उल्लेख करतील का? याकडे मात्र सर्वांचेच लक्ष लागलय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img