इस्त्रायल आणि लेबनॉनच्या हिजबुल्ला यांच्यात आता (Israel Lebanon War) युद्धाची ठिणगी पडली आहे. काल शनिवारी हिजबुल्लाने इस्त्रायलवर मिसाइल हल्ले केले. या हल्ल्यांत इस्त्रायलच्या हद्दीतील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आयडीएफने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत घरांतून आगीचे लोट बाहेर पडताना दिसत आहे. यानंतर हिजबुल्ला आणि इस्त्रायलने एकमेकांविरोधात मोठ्या सैन्य अभियानाची घोषणा केली आहे.
हिजबुल्लाने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की इस्त्रायलवर 320 पेक्षा जास्त कत्युषा रॉकेट डागण्यात आले. तसेच इस्त्रायली सैन्याच्या तळांवर मिसाइल हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायली सैन्याने लेबनॉनच्या ठिकाणांवर हल्ले सुरू केले आहेत. आयडीएफने रविवारी सकाळी आक्रमणाची घोषणा केली. हिजबुल्लाने इस्त्रायली भागात हल्ल्यांची तयारी केल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले. इस्त्रायली सुरक्षा दल आयडीएफने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात म्हटले आहे की हिजबुल्लाने लेबनॉनमधून इस्त्रायली भागात 150 पेक्षा जास्त प्रोजेक्टाइल लाँच केले. यांना आयरन डोमच्या मदतीने नष्ट करण्यात आले. आम्ही आतंकवादी ठीकाणांना नष्ट करत आहोत परंतु, त्यांच्याकडून नागरिकांना टार्गेट केले जात आहे.
रशियाच्या कच्च्या तेलाची भारताला किती गरज?
युद्धात या घडामोडी अचानक वाढलेल्या नाहीत. मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांत तणाव वाढला आहे. त्यातून युद्धाचा भडका उडाला आहे. हिजबुल्ला आणि त्याचा सहकारी इराणे सैन्य कमांडर फुआद शुक्रच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. कमांडरवरील हल्ला म्हणजे युद्धाची कारवाईच असा इशारा इस्त्रायलला देण्यात आला होता.