25.1 C
New York

Ajit Pawar : त्यांचे सा**’च काढून टाकलं पाहिजे; बदलापूर घटनेवर अजितदादांचा संताप

Published:

बदलापूरच्या (Badlapur) शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, आता या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) संताप व्यक्त केला. विकृत कृत्य करणाऱ्यांचं साxxचं कापलं पाहिजे, असं विधान त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. यवतमाळमध्ये शनिवारी (दि. 24 ऑगस्ट) रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला. याच कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यात महिला व मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवण्याची गरज आहे. त्यांना कायद्याचा धाक बसला पाहिजे. त्यांच्या मनात तशा प्रकारचा पुन्हा विचारणही येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचं तर त्यांचे साXXचं काढून टाकले पाहिजे, असा संताप अजितदादांनी व्यक्त केली.

पुढं ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवले आणि आज काही लोक महिलांसोबत चुकीच वागत आहे. बाबत सरकारने अतिशय कठोर आणि ठोस भूमिका घेतली आहे. गुन्हेगार कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याला फाशी व्हायलाच हवी, त्याची फिकिर आम्ही करणार नाही. त्याला कडक शासन करणार. बदलापूर अत्याचार प्रकरणात कोणताही हयगय केली जाणार नाही. काही लोक विकृत असतात. पण, सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकार डोळ्यात तेल घालून उभं आहे. आमच्या बहिणींवर हात लावणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल. यासंबंध शक्ती कायदा मंजूर करण्यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याचंही अजित पवार म्हणाले.

पंढरपूरात शरद पवार गटाला मिळणार बळ…?

अजित पवार यांनी यावेळी माझी लाडकी बहिण योजनेवरून विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, विरोधक लाडकी बहीण योजनेवर टीका करत आहे. या योजनेविरोधात न्यायालयात जात आहेत. पण, या योजनेच्या लाभापासून सरकार कोणालाही वंचित ठेवणार नाही. सरकारने महिलांना ओवाळणी म्हणून तीन हजार रुपये दिले. या योजनेअंतर्गत सरकार 45 हजार कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. आमच्या योजनेला मिळणारा प्रतिसाद विरोधकांना पाहावा, असं ते म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img