5.7 C
New York

Telegram : टेलिग्रामचे संस्थापक अन् मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल डुरोव यांना अटक

Published:

टेलिग्राम मेसेजिंग अॅपचे अब्जाधीश संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल डुरोव यांना पॅरिसमधील बोर्जेट विमानतळावर अटक करण्यात आली आहे. (Telegram) रॉयटर्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. टेलिग्राम हे प्रामुख्याने रशिया, युक्रेन आणि सोवियत रशियामधील देशामध्ये प्रसिद्ध आहे. फेसबुक, युट्यूब, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, टीकटॉकनंतर टेलिग्राम हे सर्वात मोठx सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहे. येत्या काळात टेलिग्रामचे युझर्स हे १ अब्ज होण्याची शक्यता आहे.

टेलिग्रामची स्थापना दुबईमध्ये रशियन वंशाच्या डुरोव यांनी केली होती. 2014 मध्ये त्यांनी व्हीके सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विरोधी नेत्यांना ब्लॉक करण्याच्या सरकारी आदेशाचे पालन करण्यास नकार दिला होता. या घटनेनंतर त्यांनी रशिया सोडला. नंतर त्यांनी हा प्लॅटफॉर्म विकला. TF1 TV आणि BFM TV ने सूत्रांच्या हवाल्याने त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे की, डुरोव त्यांच्या खाजगी विमानाने प्रवास करत होते. त्यांना प्रथम फ्रान्समध्ये अटक वॉरंट देण्यात आलं होतं. टेलिग्राम मेसेजिंग ॲप्सवर गुन्हेगारी कारवाया वाढल्याचा पोलिसांचा समज आहे. या घटनेबाबत टेलिग्रामकडून अद्याप कोणतंही वक्तव्य आलेले नाही

2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यानंतर युद्धाच्या राजकारणाविषयी दोन्ही बाजूंकडून अनफिल्टर्ड आणि कधीकधी ग्राफिक आणि दिशाभूल करणाऱ्या सामग्रीचा टेलिग्राम हा मुख्य स्त्रोत बनला आहे. हे ॲप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी संपर्काचे पसंतीचे साधन बनलं आहे. क्रेमलिन आणि रशियन सरकार देखील त्यांच्या बातम्या प्रसारित करण्यासाठी त्याचा वापर करतात. TF1 ने सांगितलं की, डुरोव अझरबैजानमधून प्रवास करत होते. स्थानिक वेळेनुसार रात्री आठच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img