8.4 C
New York

Ravindra Chavan : निधी पाहिजे असेल तर…; मंत्री रविंद्र चव्हाणांचा महिला आमदाराला अजब सल्ला

Published:

पुणे

मी कोणत्याही पदावर नव्हतो तेंव्हा आर आर आबा पाटील यांनी मला भरपूर मदत केली होती त्यामुळे तुम्ही काळजी करु नका, पण तुम्हाला मतदारसंघाच्या विकास कामासाठी निधी पाहिजे असेल तर अजित दादांकडे (Ajit Pawar) जावा. असा अजब सल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या आमदार सुमनताई आर. आर. पाटील (Sumantai Patil) यांना दिला आहे. चव्हणा यांच्यासल्ल्याचा आमदार सुमनताई यांनी निषेध केला. निधीच देणार नसाल तर बैठकीला येऊन कोणत्या कामाचा पाठपुरावा करु, असा सवाल आमदार सुमनताई यांनी बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना लेखी पत्राद्वारे करुन शुक्रवारी पुणे येथे झालेल्या बैठकीवर बहिष्कार टाकला.

बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी बांधकाम विभागांतर्गत विभागनिहाय क्षेत्र स्तरावरील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पुणे येथील विश्रामगृहात एक बैठक घेतली आहे. बैठकीस आपण उपस्थित रहावे, असे निमंत्रण सार्वजनिक बांधकाम पश्चिम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी आमदार सुमन पाटील यांना लेखी पत्राद्वारे दिले होते. त्यावर आमदार सुमन पाटील यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना एक पत्र लिहले आहे. यामध्ये म्हटले आहे, आपण दिनांक २३ ऑगस्ट २४ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत कामांची आढावा बैठक बोलविल्याचे निमंत्रण मला मिळाले आहे. त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे.

वास्तविक डिसेंबर २३ मध्ये नागपूर येथे आलेल्या अधिवेशनात दर्डा यांच्या कार्यक्रमामध्ये आपली भेट झाली होती. त्यावेळी आपणास विनंती करून निधी द्यावा असं बोलले. यावेळी आपण स्व. आबांचा उल्लेख करून असे सांगितले की, कोणत्याही पदावर नसताना आबांनी मला भरपूर मदत केलेली होती. त्यामुळे आपण काळजी करू नका. त्यानंतर चार-पाच दिवसानंतर मी आपणास कामांची यादी घेऊन भेटले, परंतू आपण निधी देण्याबाबत असमर्थ आहोत, असे सांगून दादांना भेटा तरच निधी मिळेल, असे मला सांगितले.

मार्च २४ च्या अधिवेशनामध्ये पुन्हा आपणास भेटून कामांची यादी दिली होती. आर. आर. पाटील (आबा) यांनी आपणास केलेल्या मदतीची आठवण करून दिली व निधी मागितला. तरीही मला निधी देण्यास टाळाटाळ करुन निधी देण्यास अडचणी आहेत, असे सांगितले. त्यामुळे पुणे येथील बैठकीत कोणत्या कामांचा पाठपुरावा करावा ? असाच प्रश्न मला पडल्याने आपण पाठवलेले निमंत्रण मी अगत्यपूर्वक स्वीकारते, परंतू बैठकीस अनुपस्थित राहते. आपण निमंत्रण दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे, असे आमदार पाटील यांनी मंत्री चव्हाण यांना दिलेल्या पत्रता म्हटळे आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img