26.6 C
New York

Rahul Gandhi : घरातील नव्या सदस्या बरोबरचे सुंदर फोटो राहुल गांधींनी केले शेअर

Published:

खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नुकतीच त्यांच्या इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर केली आहे. आणि ती सध्या चर्चेत आहे. चर्चेचा कारण असं की, या पोस्टचा विषय राजकारणापेक्षा वेगळा आहे. तसं पाहायला गेलं तर राहुल गांधी वैयक्तिक पोस्ट फार कमी शेअर करतात; पण त्यांनी नुकताच आता आई सोनिया गांधी यांच्यासोबतचा एक सुंदर क्षण शेअर केलाय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राहुल गांधींच्या घरांमध्ये नवीन कोण सदस्य आलाय का? तर तसं काही नाहीये, हा नवीन सदस्य दुसरा – तिसरा कोणी नसून त्यांची श्वान आहे.राहुल गांधी यांनी नुकताच पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये त्यांची आई सोनिया गांधी यांची त्या श्वानाबरोबरची घट्ट मैत्री दिसत आहे. नुरी अस तीच नाव आहे.

Rahul Gandhi नूरी कोण आहे ?


राहुल गांधींनी त्यांची आई सोनिया गांधी यांना गेल्या वर्षी जागतिक प्राणी दिनानिमित्त जॅक रसेल टेरिअर या जातीची नुरी नावाची कुत्री भेट म्हणून दिली होती. 4 ऑक्टोबर 2023 रोजी या प्राणीदिनानिमित्त आपल्या यूट्यूब चैनल वर गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये त्यांनी असं लिहिले होते की, ‘नुरीला भेटा – आमच्या कुटुंबातील नवीन सदस्य!’

जळगावमध्ये पंतप्रधान मोदींच प्रतिपादन,म्हणाले

उत्तर गोव्यातील मापुसा येथून राहुल गांधींनी हे पिल्लू आणले होते. आणि आता ती कुटुंबातील एक प्रेमळ सहकारी बनला आहे. राहुल गांधी यांची आई सोनिया गांधी यांनी जेव्हा नुरीला पहिल्यांदा पाहिले होते तेव्हाच त्यांना प्रचंड आनंद झाला होता. यावेळी त्यांनी “किती गोंडस आहे ती” असे उद्गारही काढले होते.

नूरीसोबत शेअर केलेल्या फोटोंना सध्या सोशल मीडिया वरती खूप प्रसिद्धी मिळत आहे. राजकारणा व्यतिरिक्त हा आजचा सर्वात सुंदर फोटो असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. या पोस्टवर आता लाखो कमेंट्स आणि लाईक देखील येत आहे.

गांधींच्या कुटुंबातील श्वान चर्चेत येण्याची काही पहिली वेळ नाही. या आधी देखील ‘पॅडी’ नावाचा कुत्रा गांधींच्या घरात समाविष्ट होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img