-5.2 C
New York

Narendra Modi : जळगावच्या सभेत मोदींचा विरोधकांवर घणाघात

Published:

इतिहासाच्या कोणत्याही कालखंडात मातृशक्तीचा मोठा सहभाग राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना प्राथमिक धडे माता जिजाऊ यांनी दिले. त्यामुळे राष्ट्र घडवण्यात माता भगिनींचा मोठा वाटा आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. (Narendra Modi ) ते जळगाव येथे ‘लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमात’ जळगाव येथे बोलत होते. उद्या श्रीकृष्ण जन्माष्ठमी आहे. त्या निमीत्ताने मोदींनी मराठीत संवाद साधत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Narendra Modi महिलांना स्वलंबी केल

स्वातंत्र्यानंतर जितक काम नाही झालं तितक आमच्या दहा वर्षांच्या काळात झालं आहे. पूर्वी महिलांना शिक्षणासाठीही घराबाहेर पडता येत नव्हत. परंतुस आमच्या काळात महिला स्वालंबी झाली आहे असा दावा मोदी यांनी केली आहे. तसंच, विरोधकांना मी आव्हान देतो तुम्ही आम्ही जे काम केलय तितक काम झाल्याचं काम दाखवून द्या असही मोदी यावेळी म्हणाले आहेत.

जळगावमध्ये पंतप्रधान मोदींच प्रतिपादन,म्हणाले

Narendra Modi बहिणांबाईच्या कविता

मी नुकताच बाहेर देशातून आलो. पोलंडचे लोक महाराष्ट्रातील लोकांचा मोठा सन्मान करतात. तेथे कोल्हापूर दुसऱ्या महायुद्दावेळी पोलंड्या अनेक लोकांना कोल्हापूरच्या राज परिवारने दत्तक घेतलं. तसंच, जळगाव हे संताच ठिकाण आहे. बहिणांबाईच्या कविता अनेक गोष्टींचा विचार करायला भाग पाडतात.

Narendra Modi नेपाळ दुर्घटनेबद्दल संवेदना

नेपाळ येथे महाराष्ट्रातील 25 लोकांचा अपघातात मृत्यू झाला. त्याबाबत ही घटना जेव्हा समजली तेव्हा मोठ दु:ख झालं. तात्काळ केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना नेपाळला पाठवलं. ज्या लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जी काही मदत लागेल ती सर्व केंद्र सरकार करेल अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img