छत्रपती संभाजीनगर/ उमेश पठाडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार) जळगाव दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 लाख लखपती दीदींना (MVA) प्रमाणपत्रांचे वाटप करणार आहेत. वर्षाला एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करणाऱ्या लखपती दीदींशी ते संवाद साधतीलकार्यक्रमादरम्यान पंतप्रधान 2500 कोटी रुपयांचा गुंतवणूक निधी जारी करतील. पंतप्रधान मोदी हे छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा विमानतळावर येणार आहेत. येथे महाविकास आघाडीचे नेते काळे कपडे, काळ्या फिती लावून मोदींचा निषेध करण्यासाठी उपस्थित झाले आहेत. बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते विमानतळावर पोहचले. यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदचे विरोधी पक्षनेते काळे कपडे घालून उपस्थित होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवार (25 ऑगस्ट) महाराष्ट्र आणि राजस्थान दौऱ्यावर आहेत. जळगाव येथील लखपती दीदी कार्यक्रमादरम्यान 11 लाख नवीन लखपती दीदींना सन्मानित करतील आणि त्यांना प्रमाणपत्र देणार आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी 2500 कोटी रुपयांचा निधी जारी करतील. ज्याचा 4.3 लाख बचत गटांच्या सुमारे 48 लाख सदस्यांना फायदा होणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधानांच्या हस्ते 5,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील वितरित केले जाणार आहे. ज्यामुळे 2.35 लाख बचत गटांच्या 25.8 लाख लाभार्थ्यांना फायदा होईल. लखपती दीदी योजनेंतर्गत आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले असून, सरकारने 3 कोटी लखपती दीदी बनवण्याचे ध्येय ठेवले आहे
बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडी या घटनेचा निषेध करत आहे. या घटनेचा करण्यासाठी अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात मविआच्या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते काळ्या फिती लावून, काळे कपडे घालून विमानतळावर पोहोचले. तेव्हा पोलिसांनी त्यांना तिथून हटवण्याचा प्रयत्न केला.
मातोश्रीची ताकद ‘सिल्व्हर ओक’कडे हस्तांतरित ?
माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले, म्हणाले, की हीच तत्परता पोलिसांनी बदलापूर घटनेत तातडीने गुन्हे दाखल करताना दाखवायला हवी होती. आमच्यावर सक्ती करायला आम्ही काय अतिरेकी आहोत का? काश्मीरमध्ये दहशतवादी घुसत आहेत, तिथे कोणी काही करत नाही. बदलापूरमध्ये 12-12 तास गुन्हा दाखल करत नाही, तिथे कोणी काही करत नाही, आमच्यावर कशाला सक्ती करता? असा सवाल दानवेंनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. याकडे दानवेंचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या सुरक्षेला धक्का लागू देणार नाही. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावरही आहे. ते या देशाचे प्रमुख आहेत, ते सुरक्षितच असले पाहिजे हीच आमची देखील भूमिका आहे. पोलिस, सुरक्षा व्यवस्था असेल किंवा नसेल आम्ही त्यांची सुरक्षा करु, असेही विरोधी पक्षनेते दानवे म्हणाल