विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोठी मागणी केलीये. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचा रट्टा त्यांनी लावला केली आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्या बाबात घो,णा व्हावी म्हणून ठाकरेंनी सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी भेट तिली. दिल्लीतील १० जनपथांनाही भेट दिली, परंतु सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी त्यांचे पत्ते उघडले नाहीत. एकसमान भाषा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून (शरदचंद्र पवार)वापरली जाते आहे. मुख्यमंत्र्यांची नंतर चर्चा होईल, आधी एकत्र निवडणुका जिंकायच्या आहेत. याच सुत्रावर दोन्ही पक्ष ठाम आहेत. अशात उद्धव ठाकरेंनी नवी चाल खेळली. ते म्हणाले की एमव्हीएने मुख्यमंत्र्यांचा चेहरा अंतर्गतपणे ठरवावा, जरी तो निवडणुकीनंतर सार्वजनिक केला तरी चालेल. अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. काँग्रेसनेही त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. सातत्याने एकच मागणी सुरुये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत एवढे डेस्पिरेट का आहेत? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
Uddhav Thackeray मातोश्रीची ताकद ‘सिल्व्हर ओक’कडे हस्तांतरित
गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल घडताना आपण पाहिले. अनेक दशकांपासून अतूट समजली जाणारी शिवसेना-भाजप युती संपुष्टात आली. दोन्ही पक्षांचे राजकीय भागीदार बदलले. शिवसेनेचा मुख्यमंत्री हा ठाकरे घराण्याच्या हातातील बाहुले आहे, अशी एक प्रचलित म्हण बाळासाहेबांच्या काळात होती. मुख्यमंत्र्यांसाठी वर्षा बंगल्यापेक्षा मातोश्री महत्त्वाची असायची, इथूनच सर्व सरकारी निर्णय घेतले जायचे. बाळासाहेबांच्या एका इशाऱ्यावर मनोहर जोशींसारखे नेते मुख्यमंत्रिपदावरून बाजूला झाले. राममंदिर आंदोलन आणि मुंबई दंगलींबाबतच्या त्यांच्या स्पष्टवक्तव्यावरून बराच वाद झाला, पण बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका बदलली नाही. त्यांचा ठाकरे बाणा शेवटपर्यंत कायम राहिला. ठाकरे कुटुंबीयांची नजर २०१९ च्या बदलत्या राजकारणाच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर खिळली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणारे ठाकरे घराण्याचे पहिले नेते ठरले, पण सत्ताकेंद्र मातोश्रीवरून ‘सिल्व्हर ओक’कडे सरकले. ठाकरे सरकार आणि मविआचे निर्णय शरद पवार ठरवू लागले.
CM शिंदेंच्या PM मोदींकडे पाच मोठ्या मागण्या…
Uddhav Thackeray खुर्ची मिळाती तर पक्ष टिकेल
महाविकास आघाडीतील शरद पवारांची ताकद आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी चिंतेचे कारण बनली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर बाळासाहेबांना लाभलेली एकाहाती सत्ता चालवण्याची लिगसी उद्धव यांनी गमावली. बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचे असंतुष्ट नेते निघून गेले, पण पक्ष फोडण्याची हिंमत कोणाचीच नव्हती. आता उरलेली शिवसेना सांभाळण्यासाठी पक्षाची सत्ता कायम राहणे आणि कंट्रोल ठाकरे कुटुंबीयांच्या हाती असणे आवश्यक आहे. पक्षाच्या अन्य कोणत्याही नेत्यावर ठाकरेंचा विश्वास नसल्याचं सांगितलं जातं. निवडणुकीत बहुमत मिळाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री ठरवणार नाहीत, तर खुर्ची स्वत: सांभाळतील, हे शिवसेना (उबाठा) नेत्यांनी मान्य केले आहे.
Uddhav Thackeray कॉंग्रेसचे ही दावेदार
अलीकडेच एका निवेदनात, शिवसेना (उबाठा) प्रमुख म्हणाले होते की, त्यांना निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित होणे अपेक्षित आहे. भाजपने गेल्या निवडणुकीत तोच दावा केला होता. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सुत्र ठरलं होतं. युतीत या गोष्टीमळे पाडापाडीचं राजकराण झाल्याचं बोललं गेलं. त्यामुळे त्यांना नव्या मार्गांचना चोखाळावं लागलं. कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत मविआ स्थापन करुन सरकार बनवावं लागलं. आता २०१९ च्या अनुभवाची पुनरावृत्ती त्यांना नको आहे. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चिन्नीथला म्हणाले की, पक्ष मुख्यमंत्री पद आणि जागावाटपावर खुल्या मनाने चर्चा करेल. महाविकास आघाडीत मोठा भाऊ बनण्याचा काँग्रेसचा कोणताही विचार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. मात्र, महाविकास आघाडीत अनेक छोट्या पक्षांचा समावेश करण्याचे संकेत त्यांनी दिले, त्यामुळे ठाकरे यांच्यासोबतचा कॉंग्रेसचा तणाव वाढत आहे. निवडणुकीच्या निकालात मुख्यमंत्री पदाची संपूर्ण जबाबदारी दडलेली असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचे अनेक दावेदार आहेत. ते गेल्या १० वर्षांपासून सत्तेच्या प्रतीक्षेत आहेत. शरद पवार यांना बिगरभाजप सरकार स्थापन करण्यात रस आहे. त्यांच्या समीकरणात बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ते पाठिंबा देतील. अशा स्थितीत उद्धव ठाकरेंना आणखी एक संधी मिळू शकते, पण आदित्य ठाकरेंना आपला उत्तराधिकारी बनवणं सोपं ठरणार नाहीये